Rain arrives in Ahilyanagar district : अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात पावसाची सर्वदूर हजेरी; शेतकऱ्यांना दिलासा, पेरण्यांना येणार वेग

Rain arrives in Ahilyanagar district : अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात पावसाची सर्वदूर हजेरी; शेतकऱ्यांना दिलासा, पेरण्यांना येणार वेग

0

Rain arrives in Ahilyanagar district : नगर : अहिल्यानगर शहरासह जिल्ह्याच्या विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून पावसाने हजेरी (Rain arrives in Ahilyanagar district) लावल्याने शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे. जून महिन्यात पावसाने अपेक्षित हजेरी लावली नसल्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या (Kharif Season Sowing) मोठ्या प्रमाणात खोळंबल्या होत्या. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. मात्र, आता सर्वदूर झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये नव्याने आशेचे वातावरण निर्माण झाले आहे.

खरीप पिकांच्या पेरण्यांना वेग

गेल्या महिनाभरापासून पावसाअभावी अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या पुढे ढकलल्या होत्या. काही ठिकाणी पेरणी केलेल्या पिकांनाही ओलाव्याअभावी फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात होती. मात्र, गेल्या दोन दिवसांत झालेल्या समाधानकारक पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाला असून खरीप पिकांच्या पेरण्यांना आता वेग येण्याची शक्यता आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मोठ्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा (Rain arrives in Ahilyanagar district)

जिल्ह्यातील अनेक भागांत मध्यम स्वरूपाचा तर काही ठिकाणी चांगला पाऊस झाल्याने शेततळी, ओढे आणि लहान नाल्यांमध्ये पाण्याची आवक सुरू झाली आहे. पावसामुळे वातावरणातही गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, कृषी क्षेत्राशी संबंधित तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन नियोजनबद्ध पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे. पुढील काही दिवसही पावसाचा जोर कायम राहिल्यास खरीप हंगामाला मोठा दिलासा मिळणार असून उत्पादनवाढीसाठीही ही परिस्थिती पोषक ठरणार आहे. तसेच मोठ्या पावसाची प्रतीक्षा अद्याप शेतकऱ्यांना आहे.