Warning of Heavy Rainfall : मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Warning of Heavy Rainfall : मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

0
Warning of Heavy Rainfall : मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
Warning of Heavy Rainfall : मुसळधार पावसाच्या इशाऱ्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

Warning of Heavy Rainfall : नगर : भारतीय हवामान विभागाने (India Meteorological Department) जिल्ह्यासाठी मुसळधार पाऊस व ढगफुटीची शक्यता (Warning of Heavy Rainfall) वर्तवत अलर्ट जारी केल्याच्या पार्श्वभूमीवर नदीकाठच्या गावांतील वस्तीतील नागरिकांनी सतर्क राहावे, असा इशारा (Advisory for Citizens to Remain Alert) अहिल्यानगर पाटबंधारे विभागाने दिला आहे. धरणातील पाणीसाठा व नदीपात्रातील पाण्याचा आवक लक्षात घेऊन आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन कार्यकारी अभियंता स्वप्नील काळे यांनी केले आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मुसळधार पाऊस व ढगफुटीची शक्यता (Warning of Heavy Rainfall)

भारतीय हवामान विभागाने जिल्ह्यात मुसळधार पाऊस व ढगफुटीची शक्यता व्यक्त केली असून त्यानुसार अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या धरण पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू असून धरणांमध्ये पूर्ण क्षमतेने पाण्याची आवक होत आहे. त्यामुळे नदीपात्रातील पाण्याच्या प्रवाहात वाढ होण्याची शक्यता लक्षात घेण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर धरणस्थळांच्या खालील प्रवरा नदीकाठच्या गावांतील वस्तीतील नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे.