नगर : समाज कितीही पुढे गेला असल्याचा दावा आपण करत असलो, तरी आपल्याच आजूबाजूला काही अशा घटना घडतात ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात. अशीच एक मन सुन्न करणारी घटना अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar News)घडली आहे, जिथे एका १७ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर आई बनण्याची वेळ (17-year-old girl becomes a mother) आली आहे. या गंभीर घटनेमागचं सत्य काय आहे आणि यामध्ये कोणावर गुन्हा दाखल झाला आहे? पाहू…
नक्की वाचा : लोणावळ्याला जाताय? जरा जपून.. कलम १६३ लागू; ३१ जुलैपर्यंत पर्यटकांना निर्बंध
नेमकं काय घडलं? (Ahilyanagar News)
अहिल्यानगर शहरातील एका १७ वर्षीय मुलीने बाळाला जन्म दिल्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आला. ही मुलगी १५ वर्षांची असतानाच आई-वडिलांनी तिचा विवाह नगरमधील एका मुलाशी लावून दिला होता. तिने शिरूरमध्ये गुरुवारी (दि. २) जुलैला बाळाला जन्म दिला. याप्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात रविवारी (दि. ५) चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. ही अल्पवयीन मुलगी व तिचे आई-वडील २०२४ मध्ये अहिल्यानगरमध्ये राहत होते. त्यावेळी ही मुलगी १५ वर्षांची होती. तिचा विवाह नगरमधील एका मुलाशी लावण्यात आला.
लग्नानंतर हे कुटुंब शिरूरला राहायला गेले. तिथे ती गर्भवती राहिली. तिला त्रास होऊ लागल्याने शिरूरमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिने एका बाळाला जन्म दिला. त्यावेळी ही बाब तेथील पोलिसांच्या निदर्शनास आली. त्यानंतर या प्रकरणी मुलीच्या आई-वडिलांविरोधात बालविवाह प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय.
अवश्य वाचा : इंद्रायणीला पूर, माऊलींच्या पालखीसाठी आळंदीत येणाऱ्या वारकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना
घटना नेमक्या का घडतात? (Ahilyanagar News)
मित्रांनो, ही घटना केवळ एक बातमी नाही, तर आपल्या समाजासमोर उभं असलेलं एक विदारक चित्र आहे. अल्पवयीन मुलींच्या बाबतीत घडणारे हे प्रकार रोखण्यासाठी कायदा त्याचं काम करेलच, पण समाज म्हणून आपल्यालाही अधिक सतर्क आणि संवेदनशील राहण्याची गरज आहे.



