Heritage Walk : स्व. देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त हेरिटेज वॉकचे आयोजन

ढगांनी मंतरलेल्या वातावरणात चांदबीबी महालाची सफर

0
Heritage Walk : स्व.देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त हेरिटेज वॉकचे आयोजन
Heritage Walk : स्व.देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त हेरिटेज वॉकचे आयोजन

Heritage Walk : नगर : ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास संशोधक भूषण देशमुख (Bhushan Deshmukh) यांच्या दुर्दैवी निधनानंतर आज (ता. ७) त्यांचा जन्मदिन अनेक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. नगरमधील जळालेल्या कौन्सिल हॉलचे (Council Hall) पुनरुज्जीवन करावे आणि त्यास स्व.भूषण देशमुख कौन्सिल हॉल असे नाव देण्याचे निवेदन पत्रकार, इतिहासप्रेमी, सामाजिक संघटना आणि संस्थांतर्फे महापौर ज्योती गाडे (Jyoti Gade), आयुक्त यशवंत डांगे (Yashwant Dange) यांना महापालिकेत देण्यात आले. आयुक्त आणि महापौरांनी सर्व नगरसेवकांशी या विषयावर समन्वय करून  कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.

नक्की वाचा : महावितरण कर्मचाऱ्यांचा बेजबाबदार कारभार; लोकप्रतिनिधींच्या प्रवेशद्वारावरच फांद्यांचा ढीग

ढगांनी मंतरलेल्या वातावरणात चांदबीबी महालाची सफर

यावेळी चांदबिबी महाल येथे हेरिटेज वॉक चे आयोजन करण्यात आले होते. यास उत्स्फूर्त प्रतिसाद देत नगरकरांनी धुके आणि ढगांनी मंतरलेल्या वातावरणात चांदबीबी महालाची सफर केली. महालाच्या निर्मितीचा इतिहास आणि अनोखी वास्तुरचना वैशिष्ट्यांबद्दल सतीश गुगळे यांनी माहिती दिली. ‘एक पेड ,भूषण सर के नाम’ ही संकल्पना राबवत पर्यावरणप्रेमी अमित गायकवाड यांनी विकसित केलेल्या खिरणीच्या रोपाचे रोपण यावेळी करण्यात आले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा बक्षिसे देऊन गौरव (Heritage Walk)

भारतमातेच्या आणि माणसातील “भेदाभेद भ्रम अमंगळ” असा भाव व्यक्त करणाऱ्या घोषणा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची प्रेरक भजने यांची अनुभूती सहभागी नगरकरांनी घेतली. शालेय विद्यार्थ्यांसाठी आयोजित इतिहास प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी बक्षिसे देऊन गौरव करण्यात आला. या परिसरातील वायरलेस केंद्राची माहिती सागर दाणी यांनी दिली. जिल्ह्यातील वायरलेस यंत्रणेचे कार्य, त्यामागील तंत्रज्ञान आणि आपत्कालीन परिस्थितीतील त्याचे महत्त्व दाणी यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितले. हेरिटेज वॉक उपक्रमासाठी हेरिटेज वॉक सदस्यांनी दर्जेदार ध्वनीक्षेपक यंत्रणा भेट दिली.

स्व.भूषण देशमुख यांंचे प्रेरणास्मारक उभे केले जाणार

 उपक्रमाच्या आयोजनासाठी ठाकूरदास परदेशी, बालाजी वल्लाळ, प्रफुल्ल पवार, करीमभाई रामपूरवाला,  अमित मेहेर, पात्रे, जोगदे, आबिद दुलेखान, अभिजीत वाघ , प्रवीण बोरा यांनी  परिश्रम घेतले. स्वर्गीय भूषण देशमुख यांच्या जन्मदिनानिमित्त स्नेहालय आणि विविध सामाजिक संस्थांमधील लाभार्थ्यांना स्मृतीभोजन देण्यात आले. इसळक येथील स्मृती वनात स्व.भूषण यांच्या अस्थी आणि रक्षा यांचे विसर्जन करून त्यावर चिंचेचा वृक्ष लावण्यात आला. येथे त्यांच्या जीवनकार्याची प्रेरणा जतन करण्यासाठी प्रेरणास्मारक उभे केले जाणार आहे. हेरिटेज वॉक, या नि:शुल्क सांस्कृतिक उपक्रमात सहभागी होण्यासाठी +91 98909 49414 या क्रमांकावर  संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले.

यांची उपस्थिती

यावेळी शिक्षणतज्ञ, माजी कुलगुरू डॉ.एस.बी. निमसे, उद्योजक एन.व्ही धुमाळ, सलीम सहारा, पंकज मेहेर, डॉ. गिरीश कुलकर्णी, मनोज कदम, ॲड. श्याम आसावा, कलीमुद्दीन रामपूरवाला, विकास सुतार, सतीश गुगळे, राजीव गुजर, सोनाली वाघमारे, साची फणसेकर, जया जोगदंड, कोमल भद्रे, प्रवीण मुत्याल, सीमा गंगावणे, नगरसेवक आदी उपस्थित होते.