NEET-JEE Exam : केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय? आता १२ वीच्या गुणांना मिळणार ५०% महत्त्व; ‘कोचिंग माफिया’वर बसणार चाप!

NEET-JEE परीक्षेबाबत केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय? आता १२ वीच्या गुणांना मिळणार ५०% महत्त्व; 'कोचिंग माफिया'वर बसणार चाप!

0
NEET-JEE परीक्षेबाबत केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय? आता १२ वीच्या गुणांना मिळणार ५०% महत्त्व; 'कोचिंग माफिया'वर बसणार चाप!
NEET-JEE परीक्षेबाबत केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय? आता १२ वीच्या गुणांना मिळणार ५०% महत्त्व; 'कोचिंग माफिया'वर बसणार चाप!

NEET-JEE Exam : नीट-जेईई (Medical, Engineering) प्रवेश प्रक्रियेत ऐतिहासिक बदल; १२वी बोर्डाच्या गुणांना ५०% प्राधान्य मिळण्याची शक्यता!कोचिंग माफियांची मक्तेदारी संपणार; केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या उच्चस्तरीय समितीकडून केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण शिफारस.

नगर : देशातील वैद्यकीय (NEET) आणि अभियांत्रिकी (JEE) प्रवेश परीक्षांची तयारी करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी मोठी माहिती आहे. (NEET Paper Leak Update⁠) मेडिकल आणि इंजिनिअरिंग प्रवेश प्रक्रियेत आतापर्यंतचा सर्वात मोठा क्रांतिकारी बदल होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आता विद्यार्थ्यांचे भवितव्य केवळ एकाच परीक्षेवर अवलंबून राहणार नाही, तर त्यांच्या १२वी बोर्डाच्या परीक्षेलाही तितकेच महत्त्व दिले जाणार आहे. केंद्र सरकार प्रवेश प्रक्रियेत १२वी बोर्डाच्या गुणांना तब्बल ५० टक्के भारांक (⁠12th Board Weightage in NEET⁠, ⁠JEE 50-50 फार्मूला) देण्याचा गांभीर्याने विचार करत आहे.

हेही वाचा : श्री संत निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळ्यात वारकऱ्यांची आरोग्य सेवा; मुख्यमंत्री साहाय्यता निधी कक्षाचा चरणसेवा व आरोग्य शिबिर उपक्रम

‘या’ ३ गंभीर कारणांमुळे निर्णय घेण्याची वेळ

हा निर्णय अचानक घेतला जात नसून, यामागे काही अत्यंत गंभीर कारणे आहेत.

१. पेपरफुटी आणि ‘NTA’ ची घसरलेली विश्वासार्हता:  नुकत्याच झालेल्या ‘नीट’ परीक्षेतील पेपरफुटी आणि परीक्षांमधील मोठ्या घोळामुळे ‘राष्ट्रीय परीक्षा संस्था’ च्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. यावर केंद्र सरकार कायमस्वरूपी पर्यायी व्यवस्था शोधत आहे.

 २. ‘डमी स्कूल्स’ आणि कोचिंग क्लासेसचे पेव: गल्लोगल्ली सुरू झालेले कोचिंग क्लासेस आणि ‘डमी स्कूल्स’च्या वाढत्या संस्कृतीमुळे विद्यार्थी मुख्य शालेय शिक्षणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होते.

 ३. विद्यार्थ्यांवरील प्रचंड मानसिक ताण: केवळ एकाच परीक्षेच्या दबावामुळे विद्यार्थ्यांवर प्रचंड मानसिक ताण येतो. या दबावातून दुर्दैवाने अनेक विद्यार्थी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलतात. हाच मानसिक ताण कमी करणे आणि कोचिंग माफियांची मक्तेदारी मोडणे, हे या निर्णयामागील मुख्य उद्दिष्ट आहे.

हेही वाचा : कर्जमाफीवरील अधिकृत बैठक ऐनवेळी रद्द; किसान सभेचा सरकारवर गंभीर आरोप

‘नऊ सदस्यीय’ समिती अहवाल सादर करणार (NEET-JEE Exam)

केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने या संपूर्ण परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी एक ‘नऊ सदस्यीय उच्चस्तरीय तज्ज्ञ समिती’ स्थापन केली होती. या समितीने देशातील शिक्षण पद्धती, परीक्षांमधील त्रुटी आणि विद्यार्थ्यांच्या मानसिकतेचा सखोल अभ्यास केला आहे. माहितीनुसार, ही समिती येत्या काही आठवड्यांत आपला अंतिम अहवाल सरकारकडे सादर करणार असून, त्यामध्ये या ५०% भारांकाची मुख्य शिफारस करण्यात आली आहे

नक्की पहा : भंडारदरा परिसरात अपघात; सहा पर्यटक जखमी

निर्णय लागू झाल्यास शैक्षणिक क्षेत्रात होणार ‘हे’ ४ मोठे बदल (NEET-JEE Exam)

१.   ५०-५० फॉर्म्युला: कॉलेज प्रवेशाची गुणवत्ता यादी (Merit List) तयार करताना १२ वी बोर्डाचे ५०% गुण आणि प्रवेश परीक्षेचे ५०% गुण एकत्र करून अंतिम मेरीट ठरवले जाईल.

NEET-JEE परीक्षेबाबत केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय? आता १२ वीच्या गुणांना मिळणार ५०% महत्त्व; 'कोचिंग माफिया'वर बसणार चाप!
NEET-JEE परीक्षेबाबत केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय? आता १२ वीच्या गुणांना मिळणार ५०% महत्त्व; ‘कोचिंग माफिया’वर बसणार चाप!

२. शालेय अभ्यासक्रमाशी मेळ: प्रवेश परीक्षांचा स्तर हा पूर्णपणे शालेय अभ्यासक्रमाशी सुसंगत केला जाईल. म्हणजेच, बोर्डाचा प्रामाणिक अभ्यास केला तरी विद्यार्थी ही परीक्षा सहज उत्तीर्ण होऊ शकतील, वेगळ्या कोचिंगची गरज उरणार नाही.

३. परीक्षेच्या अधिक संधी: विद्यार्थ्यांना आपले गुण सुधारण्यासाठी वर्षातून एकापेक्षा जास्त संधी देण्याचा विचार सुरू आहे.

४. पारदर्शक ऑनलाईन परीक्षा: पेपरफुटीला पूर्णपणे चाप लावण्यासाठी टप्प्याटप्प्याने या सर्व परीक्षा संगणकाधारित म्हणजेच ‘कॉम्प्युटर-बेस्ड’ (CBT) केल्या जातील.
या क्रांतिकारी निर्णयामुळे केवळ एका परीक्षेवर विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागणार नाही, तर त्यांच्या वर्षभराच्या कष्टाला बोर्डाच्या परीक्षेत योग्य न्याय मिळेल. यामुळे कोचिंग क्लासेसच्या मनमानी कारभाराला मोठा फटका बसणार आहे.