Sand Theft : नगर : राज्यात सध्या ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर करीत हजारो वारकरी पंढरीच्या वारीला (Pandharichi Wari) निघाले आहेत. तर दुसरीकडे वाळू चोरांची मजल थेट ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरापर्यंत गेली आहे. नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिरामागे प्रवरा नदीत वाळू चोरी (Sand Theft) करताना एकाला पकडण्यात आले. त्याचे नाव ज्ञानेश्वर गोरख बर्डे, तर वाहनाचा मालक रामकृष्ण नवनाथ आळकुटे. मालक आणि आणखी एक चालक मात्र पळून गेले. पोलिसांना (Police) वाहने जप्त केली आहेत.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घातला छापा
सध्या पाऊस सुरू असतानाही वाळू चोरीचे प्रकार सुरूच आहेत. मंगळवारी रात्री नेवासा शहरात वाळू चोरी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. नेवासा गावातील ज्ञानेश्वर मंदिराच्या पाठीगामे प्रवरा नदीपात्रात एक ढंपर व एक टेम्पोमधून वाळूची चोरुन वाहतूक सुरू असल्याचे पलिसांना कळाले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तेथे जाऊन छापा घातला. तेथे दोन वाहनांत वाळू भरली जात होती. पोलिसांची चाहून लागताच आरोपी पळून जाऊ लागले. त्यातील एकाला पोलिसांनी पाठलाग करून पकडले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
दोन्ही वाहने जप्त (Sand Theft)
ज्ञानेश्वर गोरख बर्डे (वय-42 वर्षे रा. खालाल पिंपरी ता.नेवासा) असे त्याचे नाव आहे. त्याच्याकडील चौकशीत वाहनमालकाचे नाव रामकृष्ण नवनाथ आळकुटे (रा. गंगानगर नेवासा ता.नेवासा) असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दोन्ही वाहने जप्त करून नेवासा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली.



