Meeting cancelled : कर्जमाफीवरील अधिकृत बैठक ऐनवेळी रद्द; किसान सभेचा सरकारवर गंभीर आरोप

0
Meeting cancelled : कर्जमाफीवरील अधिकृत बैठक ऐनवेळी रद्द; किसान सभेचा सरकारवर गंभीर आरोप
Meeting cancelled : कर्जमाफीवरील अधिकृत बैठक ऐनवेळी रद्द; किसान सभेचा सरकारवर गंभीर आरोप

Meeting cancelled : नगर : शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर आयोजित करण्यात आलेली अधिकृत बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आल्याने राज्यातील शेतकरी संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बैठकीस उपस्थित राहण्यास प्रवीण परदेशी यांनी असमर्थता दर्शवल्याने बैठक रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीस आमदार बंटी पाटील, रोहित पवार, महादेव जानकर, डॉ. अजित नवले यांच्यासह विविध शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी व अनेक आमदार उपस्थित होते. मात्र, बैठक अचानक रद्द झाल्याने उपस्थितांनी संताप व्यक्त केला.

हेही वाचा : भारताचा लाजिरवाणा पराभव; टी- २० मालिकेत इंग्लंडची आघाडी 

यामुळे बैठक रद्द

अखिल भारतीय किसान सभेचे राज्य सचिव डॉ. अजित नवले यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. कर्जमाफीच्या अटी व शर्तींमुळे शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला असून, त्याचे समर्थन करणे शक्य नसल्यामुळेच ही बैठक रद्द करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. मुख्यमंत्री कार्यालयातून मिळालेल्या सूचनेनुसार प्रवीण परदेशी यांनी ऐनवेळी बैठक रद्द केल्याचे समजत असल्याचा दावाही त्यांनी केला.

नक्की पहा : भंडारदरा परिसरात अपघात; सहा पर्यटक जखमी

तीव्र आंदोलनाचा इशारा (Meeting cancelled)

सरकारच्या या भूमिकेचा अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने तीव्र निषेध करण्यात आला असून, शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीच्या मागणीसाठी राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा डॉ. नवले यांनी दिला आहे. त्यामुळे कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्यातील राजकीय आणि शेतकरी संघटनांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हे आहेत.