Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या कामात गैरव्यवहार; चार अधिकाऱ्यांचे निलंबन

0
Jal Jeevan Mission : 'जलजीवन'च्या कामात गैरव्यवहार; चार अधिकाऱ्यांचे निलंबन
Jal Jeevan Mission : 'जलजीवन'च्या कामात गैरव्यवहार; चार अधिकाऱ्यांचे निलंबन

Jal Jeevan Mission : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या कामांमध्ये झालेल्या गैरव्यवहारांची मोठी प्रकरणे समोर आली आहेत. बनावट कागदपत्रे वापरणे, निकृष्ट कामे करणे आणि नियमबाह्यरित्या कंत्राटदारांना लाभ मिळवून दिल्याप्रकरणी राज्य शासनाने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या चार वरिष्ठ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधीकरण योजनेचे कार्यकारी अभियंता, तत्कालीन कार्यकारी अभियंता, संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता व नेवासा उपविभागाचे उपअभियंता असे चार अधिकारी या प्रकरणात निलंबित केले आहेत.

हेही वाचा : महावितरण कर्मचाऱ्यांचा बेजबाबदार कारभार; लोकप्रतिनिधींच्या प्रवेशद्वारावरच फांद्यांचा ढीग

राज्यातील पहिलीच कारवाई

जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गतच्या पाणी योजनांतील गैरव्यवहाराबाबतची राज्यातील पहिलीच सर्वांत मोठी कारवाई आहे. अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी जिल्ह्यातील ११२ गावांतील योजनांबाबत तक्रार केल्यानंतर काही योजनांच्या कामांची चौकशी करण्यात आली. ही चौकशी गुप्तपणे करण्यात आली. याबाबतचा चौकशी अहवाल पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र्यांमार्फत उपमुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात आला.

नक्की पहा : भंडारदरा परिसरात अपघात; सहा पर्यटक जखमी

गंभीर त्रुटी (Jal Jeevan Mission)

अहवालात सात पाणी योजनांची कामे अत्यंत निकृष्ट, त्यात गंभीर त्रुटी आढळून आल्या तर सात योजनांत खर्च केलेली रक्कम व केलेली कामे यात मोठी तफावत आढळली. या प्रकाराला जबाबदार धरून प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करता यावी म्हणून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे अहिल्यानगरचे कार्यकारी अभियंता जी. एस. भोगावडे, संगमनेर येथील तत्कालीन कार्यकारी अभियंता एस.आर. वारे, नेवासा उपविभागाचे उपअभियंता एस. एस. दहीफळे नेवासा उपविभागाचे तत्कालीन उपअभियंता एम. पी. धगधगे यांना निलंबित केले आहे.