Dada The Sourav Ganguly Story : सौरव गांगुलीच्या वाढदिवसानिमित्त ‘दादा – द सौरव गांगुली स्टोरी’ चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित

0
Dada The Sourav Ganguly Story : सौरव गांगुलीच्या वाढदिवसानिमित्त ‘दादा – द सौरव गांगुली स्टोरी’ चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित
Dada The Sourav Ganguly Story : सौरव गांगुलीच्या वाढदिवसानिमित्त ‘दादा – द सौरव गांगुली स्टोरी’ चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित

नगर : अभिनेता राजकुमार राव अभिनीत ‘दादा – द सौरव गांगुली स्टोरी’ (Dada The Sourav Ganguly Story) चित्रपटाचा फर्स्ट लुक पोस्टर (First look Poster) आज (ता.८) सौरव गांगुली यांच्या वाढदिवसानिमित्त (Sourav Ganguly’s Birthday) प्रदर्शित करण्यात आला आहे. त्यामुळे जगभरातील कोट्यवधी चाहत्यांसाठी हा दिवस आणखी खास ठरला आहे. चित्रपटाच्या फर्स्ट लूक पोस्टर मध्ये राजकुमार राव यांनी लॉर्ड्सच्या बाल्कनीतून जर्सी हवेत फडकावत साजरा केलेल्या सौरव गांगुली यांच्या ऐतिहासिक क्षणाची सिनेमॅटिक पुनर्निर्मिती केली आहे.

नक्की वाचा : आईने कुळव, मुलाने ओढली पाभर; जामगावच्या उघडे कुटुंबाची वेदनादायी कहाणी

२००२ मध्ये इंग्लंड विरुद्धच्या ऐतिहासिक नॅटवेस्ट ट्रॉफी विजयावेळी साकारलेला हा क्षण भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात संस्मरणीय क्षणांपैकी एक मानला जातो. गांगुली यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेटने आत्मविश्वास, निर्भयता आणि नव्या युगाची सुरुवात केली, त्याचे हे अजरामर प्रतीक मानले जाते.

अवश्य वाचा : राज्यातील ख्रिश्चन मिशनरींच्या जमिनींची तपासणी होणार; चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

चित्रपटात नेमकं काय? (Dada The Sourav Ganguly Story)

‘दादा – द सौरव गांगुली स्टोरी’ हा केवळ एका क्रिकेटपटूचा प्रवास नाही, तर भारतीय क्रिकेटचा चेहरामोहरा बदलणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची प्रेरणादायी कहाणी आहे. एका गुणी युवा क्रिकेटपटूपासून भारताच्या सर्वात प्रभावशाली कर्णधारांपैकी एक होईपर्यंतचा त्यांचा प्रवास या चित्रपटातून उलगडणार आहे. जिद्द, चिकाटी आणि अढळ आत्मविश्वासाच्या जोरावर भारतीय क्रिकेटला नवी दिशा देणाऱ्या आणि संपूर्ण पिढीला प्रेरणा देणाऱ्या सौरव गांगुली यांच्या आयुष्याला हा चित्रपट सलाम करतो.

१४ मे ला चित्रपट होणार प्रदर्शित  (Dada The Sourav Ganguly Story)

‘दादा –द सौरव गांगुली स्टोरी’चे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवाने यांनी केले असून, निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे. गुलशन कुमार, भूषण कुमार, टी-सीरिज आणि डीबीएल प्रस्तुत हा लव फिल्म्स चा चित्रपट १४ मे २०२७ रोजी जगभरातील चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार आहे.