Tigidia singhal new spider species: रेहेकुरी अभयारण्य परिसरात सापडली कोळ्याची अत्यंत दुर्मिळ ‘नवी’ प्रजाती

0
Tigidia singhal new spider species: अहिल्यानगरमध्ये जागतिक दर्जाचा शोध! रेहेकुरी अभयारण्य परिसरात सापडली कोळ्याची अत्यंत दुर्मिळ 'नवी' प्रजाती
Tigidia singhal new spider species: अहिल्यानगरमध्ये जागतिक दर्जाचा शोध! रेहेकुरी अभयारण्य परिसरात सापडली कोळ्याची अत्यंत दुर्मिळ 'नवी' प्रजाती

कर्जत: अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत (karjat) तालुक्यात असलेल्या प्रसिद्ध ‘रेहेकुरी काळवीट अभयारण्य’ (Rehekuri Blackbuck Sanctuary⁠),परिसरात वन्यजीव संशोधकांना (wildlife researchers) कोळ्याची एक अत्यंत दुर्मिळ आणि संपूर्ण जगासाठी पूर्णपणे ‘नवी’ असलेली प्रजाती (New Spider Species India) शोधण्यात यश आले आहे.

या जागतिक दर्जाच्या ऐतिहासिक शोधामुळे लंडन, मॉरिशस आणि मादागास्कर येथील शास्त्रज्ञांचे लक्ष भारताच्या या छोट्याशा भागाकडे वेधले गेले आहे. माळरान परिसंस्थेच्या संवर्धनासाठी उल्लेखनीय कार्य करणारे संदीप सिंघल यांच्या सन्मानार्थ या नव्या प्रजातीच वैज्ञानिक नाव ‘तिजिडिया सिंघल’ (Tigidia singhal) असे ठेवण्यात आले आहे.

सस्पेन्स थ्रिलर सिनेमासारखी शिकार पद्धत! (Tigidia singhal new spider species)


या कोळ्याला स्थानिक भाषेत ‘दारकरी कोळी’ म्हणजेच ‘ट्रॅपडोअर स्पायडर’ असे म्हणतात. विज्ञानाच्या पलीकडे जाऊन या कोळ्याची राहण्याची आणि शिकार करण्याची पद्धत एखाद्या सस्पेन्स थ्रिलर सिनेमापेक्षा कमी नाही.
घरासारखा दरवाजा: हा कोळी जमिनीखाली स्वतःचे उभट बीळ तयार करतो आणि त्या बिळाच्या तोंडावर माती, लाकूड आणि जाळ्याचा वापर करून हुबेहूब बंद होणारा एक ‘दरवाजा’ (दार) बनवतो.

नक्की वाचा : देशातील ५८ इंजिनीअरिंग महाविद्यालयांना कुलूप का? विद्यार्थ्यांचं काय होणार? 

कंपनांचा अचूक अंदाज (Tigidia singhal new spider species)

जेव्हा त्याला शिकार करायची असते, तेव्हा तो या दाराच्या बाहेर अत्यंत नाजूक धाग्यांचे जाळे पसरवतो आणि स्वतः दाराच्या मागे दबा धरून बसतो. बाहेरून जाणाऱ्या कोणत्याही कीटकाचा पाय जरी त्या धाग्याला लागला, तरी होणाऱ्या कंपनांवरून कोळ्याला भक्ष्याचा अचूक पत्ता लागतो. कंपनांचा सुगावा लागताच, क्षणाचाही विलंब न लावता दरवाजा खटकन उघडतो, कोळी बाहेर झेप घेतो, भक्ष्याला पकडतो आणि बिळात ओढून दरवाजा पुन्हा घट्ट बंद करतो! सेकंदाच्या काही भागात होणारी ही शिकार अत्यंत थरारक असते.

नक्की वाचा : आईने कुळव, मुलाने ओढली पाभर; जामगावच्या उघडे कुटुंबाची वेदनादायी कहाणी

निसर्गाचा नियम बदलणारा शोध (Tigidia singhal new spider species)

‘तिजिडिया’ गणातील हे कोळी सहसा जगातील अतिशय घनदाट, दमट आणि मुसळधार पाऊस पडणाऱ्या जंगलात (जसे की आपला पश्चिम घाट, मॉरिशस किंवा थेट मादागास्कर) आढळतात. मात्र, रेहेकुरीसारख्या अत्यंत कोरड्या, शुष्क आणि उष्ण माळराणावर हा कोळी सापडण्याची जगभरातील ही पहिलीच नोंद ठरली आहे. ब्रिटिश अरॅकनॉलॉजिकल सोसायटीच्या (British Arachnological Society) आंतरराष्ट्रीय संशोधन नियतकालिकात नुकताच हा शोधप्रबंध प्रसिद्ध झाला असून त्याला जागतिक मान्यता मिळाली आहे. भारतीय संशोधकांचे यशभारतीय संशोधक ऋषिकेश त्रिपाठी, डॉ. अबी तमीम वनक आणि प्रसाद बोलदे यांच्या टीमने हा ऐतिहासिक शोध लावला आहे.

नक्की वाचा : NEET-JEE Exam : केंद्र सरकारचा ऐतिहासिक निर्णय? आता १२ वीच्या गुणांना मिळणार ५०% महत्त्व; ‘कोचिंग माफिया’वर बसणार चाप!

“निसर्गात काहीही पडीक नसतं. आपल्या पायाखालच्या मातीत आणि कोरड्या समजल्या जाणाऱ्या माळरानातही जागतिक दर्जाची जैवविविधता दडलेली असू शकते, हेच या शोधाने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे,” असे संशोधकांनी स्पष्ट केले (Tigidia singhal new spider species)