Kharif Sowing | अहिल्यानगर जिल्ह्यात झाली अवघी ५१ टक्के खरीप पेरणी

0

Kharif Sowing | नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात मागील आठ दिवसांपासून पावसाने जोर धरला आहे. त्यामुळे खरीप पेरणीला (Kharif Sowing) वेग आला आहे. आतापर्यंत २ लाख ९४ हजार ४३१ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी झाली. कृषी विभागाने निश्चित केलेल्या क्षेत्राच्या तुलनेत ५०.७८ टक्के पेरा झाला आहे. सर्वाधिक ९९ हजार ४७७ हेक्टरवर कापसाची लागवड झाली.

हे वाचा – रेहेकुरी अभयारण्य परिसरात सापडली कोळ्याची अत्यंत दुर्मिळ ‘नवी’ प्रजाती

पाऊसही पेरणी जोगा नव्हता (Kharif Sowing)

जुलै महिन्यात जवळपास ६६ मिलिमीटरचा पाऊस झाला. तो पाऊसही पेरणीजोगा नव्हता. त्यामुळे जिल्ह्यात ३० जूनपर्यंत १ लाख १७हजार हेक्टर क्षेत्रावर म्हणजेच २०.२० टक्के खरीप पेरा झाला. त्यानंतर एक दोन हलक्या स्वरुपाचा पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुसळधार पावसाची वाट न पाहता खरीप पेरणीस प्रारंभ केला. ७ जुलैपर्यंत ५०.५८ टक्के क्षेत्रावर पेरणी झाल्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी सांगितले. 

नक्की वाचा : देशातील ५८ इंजिनीअरिंग महाविद्यालयांना कुलूप का? विद्यार्थ्यांचं काय होणार?

तुरीचा पेरा झाला (Kharif Sowing)

खरीप हंगामासाठी कापसाचे सर्वाधिक १ लाख २२ हजार ८७ हेक्टर क्षेत्र निश्चित केले असून, त्यापैकी आतापर्यंत ६१ टक्के म्हणजे ९९ हजार ४७७ हेक्टरवर लागवड झाली आहे. सोयाबीनला शेतकरी प्राधान्य देत असल्यामुळे आजमितीस ८७ हजार ३३० हेक्टरपैकी ५३ हजार ३२८ हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झालेली आहे. बाजरीसाठी दीड लाख हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत १८ हजार ३०६ हेक्टर क्षेत्रावर पेरा झाला आहे. शेतकऱ्यांनी तुरीला प्राध्यान्य दिल्याचे दिसून आले असून, त्यानुसार ४५ हजार ९६३ हेक्टरमध्ये तुरीचा पेरा झाला.

२१ हजार २२१ हेक्टर क्षेत्रावर उडदाचा तर ९ हजार २४६ हेक्टरवर मुगाची पेरणी झाली. अकोले तालुक्यात भाताची १ हजार ३६८ हेक्टरमध्ये भात पेरणी झाली. अकोले तालुक्यात पावसाचे जोरदार आगमन झाल्याने भात पेरणीला वेग येणार आहे.

अवश्य वाचा : पुणे शहरातील महापालिकेच्या शाळांना रविवारपर्यंत सुट्टी जाहीर; कारण काय?

याशिवाय सध्यातरी १ हजार ९१ हेक्टरवर भुईमूग, २४ हेक्टरव तीळ तर ४२ हजार ७९८ हेक्टर क्षेत्रावर मकाचा पेरा झाला आहे. एकंदरीत जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात सर्वाधिक ४८ हजार ६१० हेक्टरवर तर सर्वात कमी राहाता तालुक्यात २ हजार २१० हेक्टरवर पेरणी झालेली आहे.

तालुकानिहाय पेरणी (Kharif Sowing)

(संख्या हेक्टरमध्ये)

नगर : ७९६१

अकोले : ८२३३

जामखेड : ३०६७३

कर्जत : ३३६३४

कोपरगाव : २१४३५

नेवासा : ४२५०१

पारनेर : १२६६०

पाथर्डी : ४११४२

राहाता : २२१०

राहुरी : १४५०४

संगमनेर : ९३२५

शेवगाव : ४८६१०

श्रीगोंदा : १५४९४

श्रीरामपूर : ६०४७

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here