Kharif season : साकुरी येथे खरीप पीक विमा २०२६ योजनेचा प्रारंभ; शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने घेतला लाभ

शेतकऱ्यांना मुदतीपूर्वी अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन

0
Kharif season : साकुरी येथे खरीप पीक विमा २०२६ योजनेचा प्रारंभ; शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने घेतला लाभ
Kharif season : साकुरी येथे खरीप पीक विमा २०२६ योजनेचा प्रारंभ; शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने घेतला लाभ

Kharif season : राहाता : साकुरी येथे खरीप हंगाम (Kharif season) २०२६ साठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा (Pradhan Mantri Crop Insurance Yojana) प्रारंभ उत्साहात करण्यात आला. यावेळी परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून पीक विमा योजनेची सविस्तर माहिती जाणून घेतली तसेच ऑनलाईन अर्ज (Online Application) प्रक्रियेलाही सुरुवात करण्यात आली.

नक्की वाचा : आमची लढाई प्रवरेच्या सभासदांच्या हक्काच्या पैशांसाठी : डॉ. सुजय विखे

नैसर्गिक संकटांमुळे शेती व्यवसाय जोखमीचा

कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना सांगितले की, हवामानातील सतत होणारे बदल, अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, वादळी वारे तसेच कीड-रोग यांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेती व्यवसाय अधिक जोखमीचा बनला आहे. अशा परिस्थितीत पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी आर्थिक संरक्षण देणारी महत्त्वाची योजना असून प्रत्येक पात्र शेतकऱ्याने या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. राज्यात खरीप २०२६ हंगामासाठी सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात आली असून अधिसूचित पिकांसाठी अर्ज करण्याची मुदत जुलै अखेरपर्यंत ठेवण्यात आली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शेतकऱ्यांनी विमा संरक्षणाचा लाभ घ्यावा (Kharif season)

यावेळी शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया, विमा संरक्षण, नुकसान झाल्यास दावा कसा करावा, तसेच पीक नुकसानीची माहिती वेळेत देण्याचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक, पीक पेरा माहिती आणि इतर आवश्यक कागदपत्रांच्या आधारे अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. शुभारंभ कार्यक्रमात अनेक शेतकऱ्यांनी तात्काळ पीक विम्यासाठी अर्ज भरले. आयोजकांनी सांगितले की, अधिकाधिक शेतकऱ्यांनी विमा संरक्षणाचा लाभ घ्यावा यासाठी पुढील काही दिवस विशेष मार्गदर्शन व नोंदणी सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

शेतकऱ्यांना मुदतीपूर्वी अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन

शेतकरी प्रतिनिधींनी शासनाच्या या उपक्रमाचे स्वागत करत, प्रत्येक गावातील शेतकऱ्यांपर्यंत पीक विमा योजनेची माहिती पोहोचविण्याची गरज व्यक्त केली. पीक विमा हा केवळ औपचारिक अर्ज नसून संकटाच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारे प्रभावी सुरक्षा कवच असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व शेतकऱ्यांना मुदतीपूर्वी अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आणि खरीप हंगाम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. तरी या योजनेचा जास्तीत जास्त फायदा शेतकरी ने घ्यावा असे आवाहन csc चे जिल्हा व्यवस्थापक श्री सतीश खरड व केंद्र चालक श्री जितेंद्र जाधव यांनी केले आहे