Karjat Nagar Panchayat : कर्जतमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व भाजप एकत्र; नगराध्यक्षपदी छाया शेलार विराजमान

रोहित पवार गटाच्या चार नगरसेवकांचा बिनशर्त पाठींबा

0
Karjat Nagar Panchayat : कर्जतमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व भाजप एकत्र; नगराध्यक्षपदी छाया शेलार विराजमान
Karjat Nagar Panchayat : कर्जतमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष व भाजप एकत्र; नगराध्यक्षपदी छाया शेलार विराजमान

Karjat Nagar Panchayat : कर्जत : विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे (Ram Shinde) गटाच्या छाया सुनील शेलार यांची कर्जत नगरपंचायतीच्या (Karjat Nagar Panchayat) नगराध्यक्षपदी बिनविरोध (Unopposed) निवड झाल्याची घोषणा पीठासीन अधिकारी नितीन पाटील यांनी आज (ता. १०) केली. माजी नगराध्यक्षा रोहिणी घुले यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर मंगळवार (ता.७) रोजी भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्यावतीने छाया शेलार यांचा एकमेव अर्ज दाखल झाला होता. यावेळी सर्व नगरसेवकांनी जल्लोष करीत ग्रामदैवत संत गोदड महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतले.

नक्की वाचा : श्रीकांत दोंदे हत्येप्रकरणी विविध संघटना आक्रमक; राहुरी विद्यापीठासमोर रास्ता रोको

रोहित पवार गटाच्या चार नगरसेवकांचा बिनशर्त पाठींबा

नगरपंचायतीच्या तत्कालीन नगराध्यक्षा रोहिणी सचिन घुले यांच्या राजीनाम्यानंतर नूतन नगराध्यक्षा निवडीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. त्या अनुषंगाने सभापती प्रा. राम शिंदे गटाकडून छाया सुनील शेलार यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. या निवडीत आमदार रोहित पवार गटाच्या चार नगरसेवकांनी बिनशर्त पाठींबा जाहीर केला. छाननी प्रक्रियेत सदरचा अर्ज वैध ठरला त्यामुळे मंगळवारी (ता. ७) त्यांची बिनविरोध निवड निश्चित झाली होती. त्याची अधिकृत घोषणा शुक्रवारी (ता. १०) प्रांताधिकारी तथा पीठासीन अधिकारी नितीन पाटील यांनी केली.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

रोहिणी घुलेंसह चार नगरसेवक बैठकीस गैरहजर (Karjat Nagar Panchayat)

यावेळी राम शिंदे गटाचे नऊ आणि आमदार रोहित पवार गटाचे चार नगरसेवक विशेष सभेसाठी उपस्थित होते. तर माजी नगराध्यक्षा रोहिणी घुलेंसह त्यांचे ४ समर्थक नगरसेवक या बैठकीस गैरहजर राहिले. नगराध्यक्षा पदाची निवड जाहीर होताच सर्व नगरसेवकांना फेटा बांधत त्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नूतन नगराध्यक्षा छाया शेलार म्हणाल्या, आगामी काळात प्रा.राम शिंदे यांच्या सहकार्यातून कर्जतच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. सर्वांना सोबत घेत विकासाची गंगा सर्वसामान्य कर्जतकरांसाठी आणण्याचा संकल्प त्यांनी केला. कमी कालावधी असला तरी एक उत्तम पदाधिकारी म्हणून कर्जतरांच्या सेवेसाठी तत्पर राहण्याची ग्वाही सन्मानास उत्तर देताना दिली.

राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित

या प्रसंगी जामखेडच्या नगराध्यक्षा प्रांजल चिंतामणी, कर्जतचे माजी नगराध्यक्षा नामदेव राऊत, प्रतिभा भैलुमे, उषा राऊत, गटनेते सतीश पाटील, नगरसेवक अमृत काळदाते, प्रसाद ढोकरीकर, नगरसेविका ज्योती शेळके, लंकाबाई खरात, ताराबाई कुलथे, मोनाली तोटे, सुवर्णा सुपेकर, आश्विनी दळवी, मोहिनी पिसाळ यांच्यासह बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर,  जेष्ठनेते अड कैलास शेवाळे, अंबादास पिसाळ, शांतीलाल कोपनर, दादा सोनमाळी, किसान मोर्चाचे दत्ता नलवडे, सुनील यादव, काका धांडे, सचिन पोटरे, कर्जतचे मंडळ अध्यक्ष अनिल गदादे, आरपीआयचे संजय भैलुमे, सुनील शेलार, लाला शेळके, देवा खरात, सचिन कुलथे, विनोद दळवी, रवी सुपेकर, ओंकार तोटे आदी राजकीय पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.