Suicide : बहिरोबावाडीत ३५ वर्षीय विवाहित तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Suicide : बहिरोबावाडीत ३५ वर्षीय विवाहित तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

0
Suicide : बहिरोबावाडीत ३५ वर्षीय विवाहित तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
Suicide : बहिरोबावाडीत ३५ वर्षीय विवाहित तरुणाची राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या

Suicide : पारनेर : पारनेर तालुक्यातील बहिरोबावाडी येथील ३५ वर्षीय विवाहित तरुणाने रविवारी दुपारी १२ जुलै रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केली असलेली घटना घडली आहे. या या घटनेतील तरुणाचे नाव मंगेश रंभाजी पवार राहणार – बहिरोबावाडी ता- पारनेर असे असुन याप्रकरणी पारनेर पलीस ठाण्यात ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांच्या खबरीनुसार अकस्मित मृत्यूची (Accidental Death) नोंद करण्यात आली आहे.

गेल्या वर्षीच झाला होता विवाह

या घटनेतील तरुण हा पारनेर येथील एका हॉटेलवर वेटरचे काम करत असून गेल्या वर्षी त्याचा विवाह झाला होता. मात्र रविवारी घरगुती कारणातून किन्ही येथील त्यांच्या राहत्या घरी रविवारी दुपारी २ ते २.३० वाजणेच्या दरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना उघड झाली आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

या घटनेचा पोलीसांकडून तपास सुरू (Suicide)

त्याच्या कुटुंबीयांनी त्याला पुढील उपचारासाठी पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केले. या घटनेतील विवाहित तरुणाने आत्महत्या का केली यासंबंधीच्या घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस कॉन्स्टेबल योगेश ठाणगे पोलीस यांच्याकडे तपास आहे.