Woman’s Body Was Found In The Riverbed : मुळा नदीपात्रात आढळला विवाहितेचा मृतदेह; संगमनेरातील घटना

0
Woman's Body Was Found In The Riverbed : मुळा नदीपात्रात आढळला विवाहितेचा मृतदेह; संगमनेरातील घटना
Woman's Body Was Found In The Riverbed : मुळा नदीपात्रात आढळला विवाहितेचा मृतदेह; संगमनेरातील घटना

Woman’s Body Was Found In The Riverbed : संगमनेर : तालुक्यातील (Sangamner Taluka) जांबुत येथील २८ वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह (Dead Body) साकूर शिवारातील मुळा नदीपात्रात (Mula River) आढळून आल्याची घटना रविवारी (ता. १२) सकाळी समोर आली आहे. विठाबाई विकास घुले (वय २८, रा. जांबुत, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) असे या विवाहित महिलेचे नाव असून या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायी दिंडीत कर्जतच्या दोन मुस्लिम कुटुंबांचा सहभाग

घारगाव पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद

मिळालेल्या माहितीनुसार, जांबुत येथील विठाबाई विकास घुले या १० जुलै रोजी सकाळी शेतात जात असल्याचे सांगून घरातून बाहेर पडल्या होत्या. मात्र त्या घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला. याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात शनिवारी (ता. ११)  मिसिंगची नोंदही करण्यात आली होती. रविवारी (ता. १२) सकाळी नातेवाईकांकडून शोधमोहीम सुरू असताना साकुर शिवारातील मुळा नदीवरील टेकडवाडी येथील केटीवेअर परिसरात नदीकाठी विठाबाई घुले यांच्या चपला, शर्ट, मोबाईल फोन व स्कार्फ आढळून आले. त्यानंतर नातेवाईकांनी नदीपात्रात शोध सुरू ठेवला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

मृतदेह काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत (Woman’s Body Was Found In The Riverbed)

दरम्यान, औटी मळा परिसरातील नदीपात्रातील एका विहिरीजवळ पाण्यावर तरंगणारा एका महिलेचा मृतदेह आढळला. नातेवाईकांनी जवळ जाऊन पाहणी केली असता तो मृतदेह विठाबाई विकास घुले यांचा असल्याची ओळख पटली. मृतदेह काही प्रमाणात कुजलेल्या अवस्थेत असल्याचे दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अजय कौटे, दत्तू चौधरी, महादेव हांडे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर या महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी लोणी येथे पाठविण्यात आला. दरम्यान या प्रकरणाचा पुढील तपास घारगाव पोलीस करत आहेत.