Saint Dnyaneshwar Mauli : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायी दिंडीत कर्जतच्या दोन मुस्लिम कुटुंबांचा सहभाग

एकदिवसाच्या वारीत मोठ्या भक्तिभावाने सहभागी

0

Saint Dnyaneshwar Mauli : कर्जत : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या (Saint Dnyaneshwar Mauli) पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीत यंदा कर्जत तालुक्यातील (Karjat Taluka) दोन मुस्लिम कुटुंबांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत सामाजिक सलोखा आणि धार्मिक ऐक्याचा प्रेरणादायी संदेश दिला. हडपसर ते सासवड या टप्प्यातील सुमारे ३५ किलोमीटरचा प्रवास त्यांनी वारकऱ्यांसोबत पूर्ण केला. या कर्जतकरांच्या वारीचे विशेष आकर्षण ठरला तो अवघ्या १० वर्षांचा अझर पठाण. कठीण समजला जाणारा दिवे घाट (Dive Ghat) त्याने कोणताही थकवा न जाणवू देता उत्साहाने पार केला. लहान वयात दाखवलेले त्याचे धैर्य, चिकाटी आणि वारकरी भावनेप्रती असलेला आदर पाहून अनेक वारकरी त्याचे कौतुक करत होते.

नक्की वाचा : दुबैय्या यांच्या हत्येच्या निषेधार्थ सर्वपक्षीय बेमुदत बंद सुरुच; गुन्हेगारांवर मोक्का लावण्याची मागणी

Saint Dnyaneshwar Mauli : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायी दिंडीत कर्जतच्या दोन मुस्लिम कुटुंबांचा सहभाग
Saint Dnyaneshwar Mauli : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायी दिंडीत कर्जतच्या दोन मुस्लिम कुटुंबांचा सहभाग

एकदिवसाच्या वारीत मोठ्या भक्तिभावाने सहभागी

वारकरी संप्रदाय हा प्रेम, समता, बंधुभाव आणि मानवतेचा संदेश देणारा आहे. या परंपरेत सहभागी झालेल्या मुस्लिम कुटुंबांनी “धर्म वेगळा असला तरी माणुसकी आणि परस्पर सन्मान हेच खरे मूल्य” असल्याचा संदेश कर्जतच्या दोन मुस्लिम कुटुंबानी आपल्या कृतीतून दिला. दरवर्षी कर्जत शहरातील विविध क्षेत्रात काम करणारे १० ते १२ वारकरी जोडपे सहकुटुंब संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पंढरपूरकडे निघालेल्या पायी दिंडीत अड नंदकुमार लांगोरे यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर ते सासवड या एकदिवसाच्या वारीत मोठ्या भक्तिभावाने सहभागी होतात. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

Saint Dnyaneshwar Mauli : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायी दिंडीत कर्जतच्या दोन मुस्लिम कुटुंबांचा सहभाग
Saint Dnyaneshwar Mauli : संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पायी दिंडीत कर्जतच्या दोन मुस्लिम कुटुंबांचा सहभाग

दिवे घाट थकवा न जाणवू देता उत्साहाने केला पार (Saint Dnyaneshwar Mauli)

कर्जतचे सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक शकुर सय्यद आणि पत्रकार डॉ. अफरोजखान पठाण हे मुस्लिम कुटुंब देखील या वारीत नित्यनियमाने कपाळी गंध, भजन-कीर्तनात तल्लीन होत वारीमध्ये भक्तीच्या रसात न्हाऊन निघतात. यंदा डॉ. अफरोजखान पठाण यांचा अवघ्या १० वर्षाचा अझर आपल्या आई-वडिलांसोबत या पायी दिंडीत सहभागी झाला. हडपसर ते सासवड या टप्प्यातील कठीण समजला जाणारा दिवे घाट त्याने कोणताही थकवा न जाणवू देता उत्साहाने पार केला. सुमारे ३५ किलोमीटरचा प्रवास त्यांने माऊलींच्या वारकऱ्यांसोबत लीलया पूर्ण केला. लहान वयात अझरने पायी दिंडीत दाखवलेले धैर्य, चिकाटी आणि वारकरी भावनेप्रती असलेला आदर पाहून अनेक वारकरी त्याचे विशेष कौतुक करत होते. 

सय्यद आणि पठाण या दोन्ही कुटुंबाच्या सक्रिय सहभागामुळे पुणे-मुंबई येथील ज्ञात मित्रपरिवारातील त्यांचे सहकारी वारकरी भारावून गेले. कर्जत तालुक्यातील या दोन मुस्लिम कुटुंबांच्या सहभागाने सामाजिक ऐक्याचे सुंदर उदाहरण घडवले असून, अवघ्या १० वर्षांच्या अझरच्या जिद्दीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.