Stock Market Fraud : शेवगावच्या बहुचर्चित शेअर बाजार फसवणूक प्रकरणात आरोपी साईनाथ कवडेला उच्च न्यायालयाचा दणका

Stock Market Fraud : शेवगावच्या बहुचर्चित शेअर बाजार फसवणूक प्रकरणात आरोपी साईनाथ कवडेला उच्च न्यायालयाचा दणका

0
Stock Market Fraud : शेवगावच्या बहुचर्चित शेअर बाजार फसवणूक प्रकरणात आरोपी साईनाथ कवडेला उच्च न्यायालयाचा दणका
Stock Market Fraud : शेवगावच्या बहुचर्चित शेअर बाजार फसवणूक प्रकरणात आरोपी साईनाथ कवडेला उच्च न्यायालयाचा दणका

₹१.६१ कोटींच्या आर्थिक फसवणुकीप्रकरणी नियमित जामीन फेटाळला; गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्याचे न्यायालयाचे निरीक्षण

Stock Market Fraud : शेवगाव : शेवगाव तालुक्यात गाजत असलेल्या बहुचर्चित शेअर बाजार गुंतवणूक फसवणूक (Stock Market Fraud) प्रकरणातील मुख्य आरोपी साईनाथ कल्याण कवडे याचा नियमित जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Aurangabad Bench of the Bombay High Court) फेटाळून लावला. न्यायमूर्ती अभय वाघवासे यांनी हा आदेश देताना गुंतवणूकदारांची मोठ्या प्रमाणात फसवणूक (Fraud) झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचे नमूद केले.

१२ टक्के परताव्याचे आमिष

फिर्यादी अवधूत विनायक केदार यांनी शेवगाव पोलीस ठाण्यात २८ ऑक्टोबर २०२४ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, “ऍसिटेक सोल्युशन” या शेअर मार्केट ट्रेडिंग कंपनीच्या माध्यमातून १२ टक्के परताव्याचे आमिष दाखवून आरोपीने फिर्यादी व इतर गुंतवणूकदारांकडून तब्बल ₹1 कोटी ६१ लाख ४२ हजार ९०० रुपयांची गुंतवणूक स्वीकारली. मात्र, ना परतावा दिला, ना मुद्दल परत केल्याने फसवणूक झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

खोटी आश्वासने देऊन रक्कम स्वीकारली (Stock Market Fraud)

या प्रकरणात आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ४०६, ४०९, २०१, ३४ तसेच एमपीआयडी कायदा आणि बड्स (BUDS) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल आहे. जिल्हा व सत्र न्यायालय, अहिल्यानगर यांनी जामीन अर्ज फेटाळल्यानंतर आरोपीने उच्च न्यायालयात धाव घेतली होती.

सुनावणीदरम्यान फिर्यादीतर्फे ॲड. प्रशांत प्रभाकर गिरी यांनी जामिनास तीव्र विरोध केला. न्यायालयाने नोंदवले की, आरोपीने खोटी आश्वासने देऊन गुंतवणूकदारांकडून रक्कम स्वीकारली, तिचा अपहार केला आणि ती विविध मालमत्तांमध्ये गुंतविल्याचे प्रथमदर्शनी दिसून येते. तसेच, यापूर्वी रिट याचिकेत दिलेल्या हमीचाही भंग झाल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले.

या कारणांमुळे आरोपीचा नियमित जामीन अर्ज फेटाळण्यात आला. फिर्यादीतर्फे ॲड. प्रशांत प्रभाकर गिरी यांनी प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. योगेश कासोद आणि ॲड. पवन जोंधळे यांनी सहकार्य केले.