BLO : मतदार यादी पुनरीक्षणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा गौरव

0
BLO : मतदार यादी पुनरीक्षणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा गौरव
BLO : मतदार यादी पुनरीक्षणात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीएलओंचा गौरव

BLO : नगर : मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचा जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या हस्ते प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेची उद्दिष्टे प्रभावीपणे पूर्ण करण्यासाठी सर्व बीएलओंनी याच समर्पित भावनेने कार्य सुरू ठेवावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी यावेळी केले.

नक्की वाचा : मुळा नदीपात्रात आढळला विवाहितेचा मृतदेह; संगमनेरातील घटना

यांचा गौरव

या मोहिमेदरम्यान विविध तालुक्यांतील निवडक बीएलओंनी विशेष परिश्रम घेऊन गणनापत्रकांचे शंभर टक्के वितरण, अर्जांचे संकलन तसेच संगणकीकरणाची प्रक्रिया पूर्ण केली. गौरव करण्यात आलेल्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यामध्ये कर्जत-जामखेड मतदारसंघातील श्रीमती संगीता अशोक खेडकर (प्राथमिक शिक्षिका, गोंदर्डी), प्रकाश भाऊसाहेब नेटके (प्राथमिक शिक्षक, जळगाव), अमोल दिनकर उडाणे (प्राथमिक शिक्षक, शिंपोरा), नेवासा मतदारसंघातील श्रीमती सविता नारायण दरंदले (अंगणवाडी सेविका, कण्हेर वस्ती), शेवगाव मतदारसंघातील महेश चंद्रकांत होरणे (प्राथमिक शिक्षक, ढाकणवाडी, ता. पाथर्डी) तसेच अहिल्यानगर मतदारसंघातील रमेश दिगंबर करपे (ग्रामपंचायत कर्मचारी, कौडगाव, ता. अहिल्यानगर) यांचा समावेश होता.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांची उपस्थिती (BLO)

सादर कार्यक्रमास उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुनील गाढे, श्रीगोंदा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिकारी गौरी सावंत, निवडणूक शाखेच्या तहसीलदार श्वेता संचेती, नायब तहसीलदार विशाल सदनापूरकर, पुनर्वसन तहसीलदार हिमालय घोरपडे, कर्जतचे निवडणूक नायब तहसीलदार योगेश जाधव तसेच निवडणूक शाखेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.