Appeal : मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेसाठी १७ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

0
Appeal : मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेसाठी १७ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन
Appeal : मुख्यमंत्री बळीराजा शेत पाणंद रस्ते योजनेसाठी १७ जुलैपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

Appeal : नगर : मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना २०२६-२७ अंतर्गत नेवासा विधानसभा क्षेत्रातील विविध कामांसाठी पात्र कंत्राटदारांच्या नामनिर्देशनाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र कंत्राटदारांनी विहित नमुन्यात स्वतंत्र अर्ज दि. १७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद पाकिटात उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर यांच्या कार्यालयात समक्ष सादर करावेत, असे आवाहन उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी केले आहे.

नक्की वाचा : मुळा नदीपात्रात आढळला विवाहितेचा मृतदेह; संगमनेरातील घटना

दराच्या आधारावर नामनिर्देशन

मुख्यमंत्री बळीराजा शेत/पाणंद रस्ते योजना उपविभाग, अहिल्यानगर यांनी प्रसिद्ध केलेल्या सार्वजनिक जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेल्या प्रचलित तासिका दर (एल-१) दराच्या आधारावर कंत्राटदारांचे नामनिर्देशन करण्यात येणार आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

आवश्यक कागदपत्रे (Appeal)

योजनेसंदर्भातील जाहिरात, अटी-शर्ती, आवश्यक कागदपत्रांची माहिती तसेच अर्जाचा नमुना अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर तसेच उपविभागीय अधिकारी, अहिल्यानगर यांच्या कार्यालयात उपलब्ध आहे. इच्छुक कंत्राटदारांनी विहित कालावधीत, शासकीय सुट्टीचे दिवस वगळून अर्ज सादर करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.