DC Meeting : जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण (दिशा) समितीची बैठक संपन्न; खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे अधिकाऱ्यांना ‘हे’ निर्देश 

0
DC Meeting : जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण (दिशा) समितीची बैठक संपन्न; खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे अधिकाऱ्यांना ‘हे’ निर्देश
DC Meeting : जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण (दिशा) समितीची बैठक संपन्न; खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे अधिकाऱ्यांना ‘हे’ निर्देश

DC Meeting : नगर : केंद्र शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणी तत्काळ निदर्शनास आणून द्याव्यात. केंद्र शासन स्तरावर पाठपुरावा करून त्या दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. लाभार्थ्यांना योजनांचा लाभ वेळेत व पारदर्शकपणे मिळावा, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करत संवाद-समन्वयातून केंद्रपुरस्कृत योजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश खासदार तथा दिशा समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब वाकचौरे यांनी दिले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांची उपस्थिती 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जिल्हा विकास समन्वय व नियंत्रण (दिशा) समितीच्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस समितीचे सहअध्यक्ष तथा खासदार निलेश लंके, आमदार विवेक कोल्हे, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, उपवनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, प्रकल्प संचालक मंजुषा ठवकर तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

नक्की वाचा : मुळा नदीपात्रात आढळला विवाहितेचा मृतदेह; संगमनेरातील घटना

अधिकाऱ्यांना सूचना (DC Meeting) 

खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले, योजनांच्या अंमलबजावणीत कोणत्याही प्रकारच्या तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचणी असल्यास त्या तत्काळ समितीच्या निदर्शनास आणून द्याव्यात. केंद्र शासनाकडे प्रभावी पाठपुरावा करून त्या दूर करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही केली जाईल. प्रधानमंत्री कुसुम (पीएम-कुसुम) योजनेतील प्रलंबित अर्जांचा जलदगतीने निपटारा करून पात्र शेतकऱ्यांना लाभ मिळेल, याची दक्षता घ्यावी. भविष्यातील वाढती वीजगरज लक्षात घेऊन जिल्ह्यात सौरऊर्जा प्रकल्पांना प्राधान्य द्यावे. शासकीय कार्यालये, जिल्हा परिषद शाळा व ग्रामीण भागात सौरऊर्जा प्रणाली उभारण्यासाठी विशेष नियोजन करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.