P2P Battle : ‘शिवदुर्ग’च्यावतीने पावनखिंड वीरांना आदरांजली; पावनखिंड रणसंग्रामाला उजाळा

P2P Battle : ‘शिवदुर्ग’च्यावतीने पावनखिंड वीरांना आदरांजली; पावनखिंड रणसंग्रामाला उजाळा

0
P2P Battle : ‘शिवदुर्ग’च्यावतीने पावनखिंड वीरांना आदरांजली; पावनखिंड रणसंग्रामाला उजाळा
P2P Battle : ‘शिवदुर्ग’च्यावतीने पावनखिंड वीरांना आदरांजली; पावनखिंड रणसंग्रामाला उजाळा

P2P Battle : शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराच्या वतीने शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन संस्थेच्या कार्यालयात १३ जुलै रोजी पावनखिंड रणसंग्रामास ३६६ वर्ष पूर्ण झाल्याचे निमित्ताने वीर शिवा काशिद, बाजी प्रभु, रायाजी बांदल आणि अनामिक ३०० बांदल वीरांना आदरांजली वाहण्यात आली. व इतिहासाला उजाळा देण्यात आला.

नक्की वाचा : मुळा नदीपात्रात आढळला विवाहितेचा मृतदेह; संगमनेरातील घटना

पावनखिंड रणसंग्राम

छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यात घडलेला अत्यंत मोठा बाका प्रसंग म्हणून पन्हाळ्याहून सुटका हा दिवस म्हणजे १२ व १३ जुलै १६६० या दिवशी घडलेला घोडखिंडीतील रणसंग्राम… ही अत्यंत अलौकिक ऐतिहासिक घटना आहे. ३०० बांदल सैन्याने लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा वाचला पाहिजे या निष्ठेने स्वराज्यासाठी दिलेले बलिदान आपण विसरता कामा नये म्हणून सह्याद्रीतील गडकोटांची अखंडित परिक्रमा करणाऱ्या शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन परिवाराच्या मावळ्यांनी श्रीगोंदा शहरात प्रथमच या वीरांना आदरांजली अर्पण करून या इतिहासाला उजाळा देण्यात आला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पन्हाळा ते पावनखिंड मोहीम (P2P Battle)

हा इतिहास व शिवकाळ आपल्याला माहिती व्हावा जगता यावा म्हणून शिवदुर्ग ट्रेकर्स फाऊंडेशन ही संस्था गेली पाच वर्षे हिल रायडर्स फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या सोबत पन्हाळा ते पावनखिंड ५२ किमी. अंतराची ऐतिहासिक पदभ्रमंती मोहिम करत आहे. दिनांक १८, १९ जुलै रोजी दोन दिवसीय ७५वी राज्यस्तरीय पन्हाळा पावनखिंड मोहिम होणार असून पावनखिंड येथे या शूर वीरांना अभिवादन करण्यात येणार आहे. श्रीगोंदा, दौंड, बारामती येथून शिवदुर्ग सोबत १०० सदस्य सहभागी होत आहेत. यावेळी शिवदुर्गचे अध्यक्ष राजेश इंगळे, मारूती वागस्कर, सागर शिंदे, अक्षय ओहळ, ईश्वर कोठारे आविष्कार इंगळे हे उपस्थित होते.