
Gold Chain Snatcher : नगर : अहिल्यानगर शहरातील कायनेटिक चौक ते सीना नदी पुलादरम्यान रविवारी (ता.१२) रात्री दुचाकीवरून जात असलेल्या एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मनीमंगळसूत्र दोघा चोरट्यांनी (Gold Chain Snatcher) भरधाव दुचाकीवरून येत हिसकावून नेल्याची घटना घडली. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१० ग्रॅमचे सोन्याचे मनीमंगळसूत्र हिसकावून घेतले
याबाबत रेणुका सुरेश नन्नवरे (वय ३६, रा. आदर्श गौतमनगर, कायनेटिक चौक) यांनी सोमवारी (ता. १३) फिर्याद दिली आहे. त्या रविवारी रात्री ११.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून पेट्रोल भरण्यासाठी जात होत्या. त्या कायनेटिक चौक ते सिना नदी पुलादरम्यान पोहोचल्या असता, मागून एका दुचाकीवर आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या दुचाकीच्या जवळ आले. यावेळी मागे बसलेल्या चोरट्याने रेणुका नन्नवरे यांच्या गळ्यातील सुमारे १० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनीमंगळसूत्र जोरात हिसकावून घेतले. त्यानंतर दोन्ही चोरटे सक्कर चौकाच्या दिशेने भरधाव वेगाने पसार झाले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
जबरी चोरीचा गुन्हा दाखल (Gold Chain Snatcher)
घटनेनंतर रेणुका नन्नवरे यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात येत असून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे.


