Criminals Police Parade : अहिल्यानगर शहरातील ५१ गुन्हेगारांची पोलिसांकडून परेड; भाईगिरी, गँगवार व खंडणीप्रकरणी कठोर कारवाईचा इशारा

Criminals Police Parade : अहिल्यानगर शहरातील ५१ गुन्हेगारांची पोलिसांकडून परेड; भाईगिरी, गँगवार व खंडणीप्रकरणी कठोर कारवाईचा इशारा

0

Criminals Police Parade : नगर : अहिल्यानगर शहरातील कायदा व सुव्यवस्था (Law and Order) अधिक बळकट करण्याच्या उद्देशाने शहर पोलिसांनी मंगळवारी (ता.१४) प्रतिबंधात्मक कारवाई (Preventive action by the police) करत कोतवाली, तोफखाना आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील ५१ सराईत गुन्हेगारांची परेड (Criminals Police Parade) घेतली. यावेळी गुन्हेगारांना भविष्यात भाईगिरी, खंडणी, दहशत निर्माण करणे, मारामाऱ्या तसेच शस्त्रांचा बेकायदेशीर वापर केल्यास कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला.

प्रतिबंधात्मक कारवाई

पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली. त्यानुसार शहर उपविभागातील दोन किंवा त्यापेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारांना नोटिसा बजावून संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. या मोहिमेत कोतवाली पोलीस ठाण्यात २५, तोफखाना पोलीस ठाण्यात ११ आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात १५ अशा एकूण ५१ सराईत गुन्हेगारांची परेड घेण्यात आली. या सर्वांची चौकशी करून त्यांच्याकडून इंटरोगेशन फॉर्म भरून घेण्यात आले. तसेच ज्या गुन्हेगारांवर यापूर्वी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेली नव्हती, त्यांच्याविरूध्द आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

कायदा बिघडविण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही (Criminals Police Parade)

पोलिसांनी उपस्थित गुन्हेगारांना शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था बिघडविण्याचा कोणताही प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही, कोणत्याही प्रकारची गुन्हेगारी, दहशत, खंडणी किंवा शस्त्रांचा बेकायदेशीर वापर आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा शहर पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी दिला.