
Government Decision : नगर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालील महसूल विभागाने ‘महाराष्ट्र जमीन महसूल (भोगवटादार वर्ग-२ आणि भाडेपट्ट्याने दिलेल्या जमिनींचे भोगवटादार वर्ग-१ मध्ये रूपांतर करणे) (दुसरी सुधारणा) नियम, २०२६’ मध्ये सुधारणा केल्या आहेत.
नक्की वाचा : डांबरी रस्त्यावर डागडुजी करताना टाकला मुरूम; गटाराची पाईपलाईन फुटल्याने घाण पाणी रस्त्यावर
अधिसूचना जारी
याबाबतची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेद्वारे जमिनीच्या रूपांतरण प्रक्रियेला आता अधिक कायदेशीर बळकटी आणि गती मिळणार आहे. या सुधारणांमुळे सहकारी गृहनिर्माण संस्था, मिश्र वापराचे भूखंड, स्वयं-पुनर्विकास प्रकल्प आणि भाडेपट्ट्यावरील जमिनींच्या मालकी हक्काचे प्रश्न सुटतील.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
प्रक्रिया आता अधिक सुलभ (Government Decision)
यात नजराणा निश्चिती, शासनाची पूर्वपरवानगी आणि अर्ज निकाली काढण्यासाठीची कालबद्ध कार्यपद्धती स्पष्टपणे नमूद केली आहे. या पारदर्शक धोरणामुळे नागरिक आणि विविध संस्थांना प्रशासकीय कामात मोठा दिलासा मिळणार असून, जमिनींच्या मालकी हक्काची प्रक्रिया आता अधिक सुलभ झाली आहे.


