
One arrested with cannabis : नगर : श्रीरामपूर शहरातील वार्ड क्रमांक दोन परिसरात अंमली पदार्थविरोधी कारवाई (Anti-narcotics operation) करत स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने एका संशयिताला गांजासह अटक (One arrested with cannabis) केली. आरोपीकडून सुमारे ६०४.८४ ग्रॅम गांजा, रोख रक्कम व इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा १७ हजार ६२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. इरफान छोटू शेख (वय ४०), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
नक्की वाचा : जन्म, मृत्यूच्या दाखल्यांसाठी नागरिकांचे हेलपाटे!; महापालिका प्रशासनाचा सावळा गोंधळ
घरात गांजा साठवून करत हाेता विक्री
अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थांची विक्री व तस्करी रोखण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना गुप्त बातमीदारामार्फत वार्ड क्रमांक दोन मधील कुरेशी मोहल्ल्यात राहणारा इरफान छोटू शेख (वय ४०) हा घरात गांजा साठवून विक्री करत असल्याची माहिती मिळाली.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
श्रीरामपूर शहर पोलीसांच्या मदतीने छापा(One arrested with cannabis)
या माहितीच्या आधारे श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या मदतीने संबंधित घरावर छापा टाकण्यात आला. झडतीदरम्यान घरात ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत ६०४.८४ ग्रॅम गांजा आढळून आला. चौकशीदरम्यान हा गांजा बजरंग चौक परिसरातील ‘फकिर’ (पूर्ण नाव उपलब्ध नाही) याच्याकडून आणल्याची कबुली आरोपीने दिली असून संबंधित संशयित सध्या फरार आहे. कारवाईत आरोपीकडून १५ हजार १२१ रुपयांचा गांजा, दोन हजार रुपयांची रोख रक्कम आणि ५०० रुपयांचा इलेक्ट्रॉनिक वजनकाटा असा एकूण १७ हजार ६२१ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल रमीजराजा रफीक आतार यांच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने केली.


