CCTV : राहाता : शहरातील (Rahata city) पिंपळस रोड लगत असणाऱ्या वसंतनगर सदाफळ वस्तीच्या भागात मोटार सायकल चोरट्यांनी (Thieves) धुमाकूळ घातला असून या ठिकाणाहून मोटरसायकल चोरीचा अनेकदा प्रयत्न झाला परंतू नागरिकांची सतर्कता व हँडललॉक न तुटल्याने चोरांचा दुचाकी चोरीचा प्रयत्न फसला चोरट्यांच्या दहशतीने येथील नागरिक भीतीच्या सावटाखाली रात्र रात्र जागत आहे. या भागात पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी तसेच परिसर अधिक सुरक्षित करण्याच्या दृष्टीने मोहनबाग चौकात सीसीटीव्ही (CCTV) कॅमेरे बसवावे अशी मागणी या परिसरातील नागरिक करत आहेत.
नक्की वाचा : प्रेरणा प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांचे स्वागत; महाप्रसाद, टॉवेल व रेनकोटचे वाटप
दुचाकी चोरण्याचा प्रयत्न
राहाता शहरातील लोकरूची नगर मोहनबाग परिसराच्या पश्चिमेस असलेल्या सदाफळ वस्ती वसंतनगर परिसरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असल्याची चर्चा नागरिक करत आहे पिंपळस रोड लगत असलेल्या या उपनगरात चोरट्यांनी दुचाकी चोरण्याचा प्रयत्न केला मात्र नागरिकांची सतर्कता आणि दुचाकीच्या हँडलचे लॉक न तुटल्याने चोरट्यांचा चोरीचा डाव फसला असे असले तरी या भागात छोट्या-मोठ्या चोऱ्यांचे प्रकार घडत असल्याचे येथील नागरिकांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सीसीटीव्ही उभारणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे (CCTV)
या भागात छोट्या-मोठ्या चोऱ्या करण्याबरोबरच आता चोरट्यांनी चोरी करिता मोटारसायकली लक्ष केले असल्याचे दिसून येत आहे अत्यंत वर्दळीचा तसेच नागरिकांना सकाळ-संध्याकाळ जॉगिंग करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या पिंपळस रस्त्यावर सीसीटीव्ही उभारणे सुरक्षिततेच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे सीसीटीव्ही नसल्याने हा भाग चोरट्यांनी लक्ष केला की काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे नगरपरिषद प्रशासनाने येथील मोहनबाग चौकात मतसेच भगिनींची तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही उभारणे गरजेचे असल्याचे येथील नागरिक बोलत आहे.



