Prerana Pratishthan : प्रेरणा प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांचे स्वागत; महाप्रसाद, टॉवेल व रेनकोटचे वाटप

तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर

0
Prerana Pratishthan : प्रेरणा प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांचे स्वागत; महाप्रसाद, टॉवेल व रेनकोटचे वाटप
Prerana Pratishthan : प्रेरणा प्रतिष्ठानकडून वारकऱ्यांचे स्वागत; महाप्रसाद, टॉवेल व रेनकोटचे वाटप

Prerana Pratishthan : नगर : आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi) निमित्त पंढरपूरकडे प्रस्थान करणाऱ्या संत ज्ञानेश्वर माऊली (नेवासा) पालखी व संत निवृत्ती महाराज यांच्या पालखीचे अहिल्यानगर शहरात उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी आमदार संग्राम जगताप (Sangram Jagtap) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा प्रतिष्ठानचे (Prerana Pratishthan) वैभव ढाकणे यांच्या माध्यमातून वारकरी बांधवांसाठी महाप्रसाद, टॉवेल तसेच रेनकोटचे वाटप करण्यात आले.

नक्की वाचा : डांबरी रस्त्यावर डागडुजी करताना टाकला मुरूम; गटाराची पाईपलाईन फुटल्याने घाण पाणी रस्त्यावर

तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर

यावेळी, प्रेरणा प्रतिष्ठानचे वैभव ढाकणे म्हणाले की, आमदार संग्राम जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवत आहोत. आमचे प्रेरणास्थान स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि स्वर्गीय आमदार अरुणकाका जगताप यांनी दिलेला तळागाळातील सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहण्याचा संदेश आम्ही कृतीतून जपण्याचा प्रयत्न करत आहोत. वारकरी संप्रदायाची सेवा करणे ही आमच्यासाठी भाग्याची गोष्ट असून, भविष्यातही असे सामाजिक व सेवाभावी उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येतील. कार्यक्रमात उपस्थितांनी वारकरी बांधवांना शुभेच्छा देत विठ्ठल नामाचा जयघोष केला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम (Prerana Pratishthan)

भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा सुंदर संगम या उपक्रमातून अनुभवायला मिळाला. या कार्यक्रमास ॲड. सचिन जगताप, माणिक विधाते , डॉ. हर्षवर्धन तन्वर, उद्योजक आशिष पोखरणा, गोरख पडोळे, संतोष ढाकणे, सागर गुंजाळ, सूरज कोतकर, महेंद्र उपाध्ये, विशाल पवार, योगेश खताळ, गराडे, अनिकेत चव्हाण, निलेश ससाणे, शिवतेज भागानगरे, स्वप्नील भोरे, ओंकार आव्हाड, मिलिंद शिंदे तसेच सहमित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.