
Dindi :अहिल्यानगर : श्री क्षेत्र भेर्डापूर ते श्री क्षेत्र पंढरपूर (Shri Kshetra Pandharpur) असा विठ्ठल नामाचा अखंड गजर करीत मार्गक्रमण करणाऱ्या गंगामैया पायी दिंडी (Dindi) सोहळ्याचा भिंगार येथील प्राचीन श्री शुक्लेश्वर मंदिरात मुक्काम झाला. यानिमित्त श्री शुक्लेश्वर देवस्थान (Shri Shukleshwar Temple), शुक्लेश्वर आरती मंडळ, शुक्लेश्वर भजनी मंडळ तसेच मंदिरातील सेवेकरी आणि भाविकांच्या वतीने दिंडीचे उत्साहात स्वागत करण्यात आले.
नक्की वाचा : जन्म, मृत्यूच्या दाखल्यांसाठी नागरिकांचे हेलपाटे!; महापालिका प्रशासनाचा सावळा गोंधळ
वारकऱ्यांनी केले आयोजकांच्या सेवाभावाचे कौतुक
दिंडीच्या मुक्कामानिमित्त शेकडो वारकऱ्यांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. आमटी, भात, चुलीवरील भाकरी आणि ठेचा असा पारंपरिक व सात्त्विक महाप्रसाद प्रेमपूर्वक वाढण्यात आला. वारकऱ्यांनीही आयोजकांच्या सेवाभावाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. मंदिर परिसर टाळ-मृदुंगाचा गजर, भजन, हरिपाठ आणि विठ्ठल नामाच्या जयघोषाने भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. या सेवाकार्यात श्री शुक्लेश्वर देवस्थान, शुक्लेश्वर आरती मंडळ, शुक्लेश्वर भजनी मंडळ, स्थानिक युवक आणि अनेक भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. मुक्काम, भोजन, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सुविधांची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती. या महाप्रसादासाठी धाडगे आणि हापसे कुटुंबीय यांनी विशेष पुढाकार घेत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या सहकार्यामुळे हा सेवाभावी उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
नितीन हापसे म्हणाले (Dindi)
वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची खरी सेवा आहे. विठ्ठल भक्तांची सेवा करण्याची संधी मिळणे, हे आमचे भाग्य आहे दरवर्षी हा सेवेचा उपक्रम अधिक भक्तिभावाने आणि मोठ्या स्वरूपात राबविण्याचा आमचा प्रयत्न राहील वारकऱ्यांच्या आशीर्वादातूनच अशा सेवाकार्यास प्रेरणा मिळते.


