नगर : गणेशोत्सव (Ganeshotsav) हा अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपला आहे. याच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देशभरात श्री गणेशाच्या आगमनाची लगबग सुरू झाली आहे. शहरांसह ग्रामीण भागातील मूर्तिकारांच्या कार्यशाळांमध्ये सध्या गणेशमूर्ती साकारण्याचे काम वेगाने सुरू झाले आहे. दिवस-रात्र मेहनत घेत कारागीर आकर्षक आणि विविध आकारांच्या मूर्तींना अंतिम रूप देत आहेत. मात्र यंदा वाढत्या महागाईचा फटका गणेशोत्सवालाही बसलाय. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीमुळे गणेशमूर्तींच्या (Ganesh Murti Price Hike) दरात सरासरी २० टक्क्यांची वाढ (20% increase) झाली आहे.
नक्की वाचा : सोनम वांगचुक यांचं उपोषण नेमकं कशासाठी? मागण्या काय?
गणेशमूर्तींच्या विक्री दरावर परिणाम (Ganesh Murti Price Hike)

शाडू माती, प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी), फायबर, रंग, लाकूड, तसेच सजावटीच्या साहित्याच्या किमतीत गेल्या काही महिन्यांत मोठी वाढ झाली आहे. त्यातच वाहतूक, वीज आणि मजुरीच्या वाढत्या खर्चामुळे उत्पादन खर्च लक्षणीय वाढला असून, त्याचा थेट परिणाम गणेशमूर्तींच्या विक्री दरावर झाला आहे. महागाईत देखील गणेशभक्तांचा उत्साह मात्र कायम आहे. अनेकांनी आपल्या पसंतीच्या गणेशमूर्तींचे आगाऊ बुकिंग केले असून सार्वजनिक गणेश मंडळांसह घरगुती गणपतींसाठीही विविध पारंपारिक आणि आकर्षक संकल्पनांवर आधारित मूर्ती तयार केल्या जात आहे.
अवश्य वाचा : देवाभाऊंनी देशाचं नेतृत्व म्हणून आपण पांडुरंगाला साकडं घालू; दत्तात्रय भरणेंचं मोठं वक्तव्य
राज्यात यंदाही पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेश मूर्तींना नागरिकांची विशेष पसंती मिळत असल्याचे मूर्तीकारांनी सांगितले. साधेपणा, पारंपरिक स्वरूप आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या मूर्तींना यंदा अधिक मागणी असल्याचे चित्र आहे. मूर्तिकारांच्या मते, सातत्याने वाढणाऱ्या कच्च्या मालाच्या किंमतीमुळे दरवाढ गरजेची ठरली असली, तरी दर्जा आणि कलात्मकतेशी कोणतीही तडजोड करण्यात आलेली नाही. ग्राहकांना दर्जेदार, आकर्षक आणि पर्यावरणपूरक गणेशमूर्ती उपलब्ध करून देण्यावरच भर दिला जात आहे.
स्थानिक मूर्तीकारांनी गणेशभक्तांना स्थानिक कारागिरांकडूनच गणेशमूर्ती खरेदी करण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे स्थानिक कला, पारंपरिक मूर्तीकला आणि हजारो कारागिरांच्या रोजगाराला बळ मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
गणेशमूर्ती महाग होण्याची प्रमुख कारणे ((Ganesh Murti Price Hike)
शाडू माती, पीओपी आणि फायबरच्या किमतीत झालेली वाढ
रंग, वार्निश व सजावटीच्या साहित्याचा वाढलेला खर्च
मजुरी आणि वाहतूक खर्चात वाढ
वीजदर वाढल्याने उत्पादन खर्चात वाढ
परिणामी गणेशमूर्तींच्या किमतीत सरासरी २० टक्क्यांची वाढ
महागाई दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे मातीच्या व रंगाच्या वाढलेल्या किमंतीमुळे मुर्त्या बनविणे अवघड झाले आहे. यामुळे गणेश मूर्तीची किंमत २० टक्के वाढविण्या शिवाय पर्याय नाही. २ हजार ते २५०० किंमत असलेली गणेश मूर्ती आता वाढीव दराने ३ हजार ते ३२०० रुपये अशी असणार आहे.



