‘Chaliha’ Festival : सिंधी समाजाचा “चालिहो” उत्सवास प्रारंभ

'Chaliha' Festival : सिंधी समाजाचा "चालिहो" उत्सवास प्रारंभ

0
'Chaliha' Festival : सिंधी समाजाचा
'Chaliha' Festival : सिंधी समाजाचा "चालिहो" उत्सवास प्रारंभ

‘Chaliha’ Festival : नगर : सिंधी बांधवांच्या (Sindhi Community) 40 दिवसाचा (16 जुलै ते 24 ऑगस्ट) उपवासाचा पर्व अर्थात ‘चालिहो साहिब’ (‘Chaliha’ Festival) ची कालपासून मोठ्या उत्साहात, श्रद्धाभावाने सुरुवात झाली. सिंधी कॉलनी, तारकपूर येथील श्री झुलेलाल मंदिर येथे चालिहो व्रत आरंभ निमित्त आयोजित कार्यक्रमात पूज्य बहराणो साहिब ची पूजा, आरती, अखो, पल्लव तसेच भजन म्हणत उत्सवाचा प्रारंभ उत्साहात करण्यात आला. याप्रसंगी सिंधी जनरल पंचायत ट्रस्टचे कार्यकारणी सदस्य, श्री झुलेलाल मंदिर समिती सदस्य, अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने महिला व पुरुष भाविक उपस्थित होते, याप्रसंगी भाविकांना प्रसाद वाटप करण्यात आले.

श्री झुलेलाल मंदिर

या शिवाय सावेडी येथील सतनाम साक्षी गोशाळेत तसेच गुलमोहर रोड वरील माता लालवारी झुलेलाल मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांनी चालिहो उत्सवास प्रारंभ करण्यात आला.चालिहो नावाच्या या धार्मिक सण उत्सवाला सिंधी समाजात आगळे वेगळे असे महत्त्व आहे, चालिहो हा वरूण देवता झुलेलाल यांच्या पूजेशी संबंधित असून भगवान झुलेलाल हे सिंधी समाजाचे इष्टदेव आहे, चालिहो याचा अर्थ 40 दिवसाचा उपवास, व्रत, पूजा इत्यादी. झुलेलालदेव चे असंख्य भक्त 40 दिवसाचा उपवास करतात या काळात काही नियम पाळीत वरूण देवतेची पूजा व स्तुती करण्यात येते. मंदिरात जाऊन सामूहिक प्रार्थनेद्वारे समस्त मानव जातीच्या कल्याणाची भावना व्यक्त करीत वरूण देवतेकडे सगळीकडे चांगला पाऊस पडू दे व सुजलाम सुफलाम होऊ दे अशी विनंती केली जाते.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

भजनसंध्या कार्यक्रमांचे आयोजन (‘Chaliha’ Festival)

सिंधी कॉलनी येथील श्री झुलेलाल मंदिरात पुढील 40 दिवस दररोज सायंकाळी आरती, पल्लव चा कार्यक्रम होणार असून नंतर भाविकांना प्रसाद वाटप करण्यात येईल, याशिवाय झुलेलाल चालीसा पाठ व भजनसंध्या कार्यक्रमांचे आयोजन ठिकठिकाणी चालिहो उत्सव काळात करण्यात येणार असून भाविकांनी लाभ घ्यावा असे आव्हान सिंधी जनरल पंचायत ट्रस्ट तर्फे करण्यात आले आहे.