Crime News : शाळकरी विद्यार्थिनीचा रस्त्यात अडवून विनयभंग; राहुरीत उसळली संतापाची लाट 

महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

0
Crime News : शाळकरी विद्यार्थिनीचा रस्त्यात अडवून विनयभंग; राहुरीत उसळली संतापाची लाट
Crime News : शाळकरी विद्यार्थिनीचा रस्त्यात अडवून विनयभंग; राहुरीत उसळली संतापाची लाट

Crime News : राहुरी : तालुक्यातील (Rahuri Taluka) निंभेरे, तुळापूर परिसरात एका अल्पवयीन (Minor) शाळकरी विद्यार्थिनीला रस्त्यात अडवून विनयभंग करण्यात आल्याची घटना १५ जुलै रोजी सायंकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात संतापाची लाट उसळली असून, या घटनेच्या निषेधार्थ तुळापूर आणि निंभेरे या दोन गावांनी कडकडीत बंद (Strictly closed) पाळला.

नक्की वाचा : पाथर्डी येथे शनिवारी नोकरी मेळाव्याचे आयोजन

आरोपीला तत्काळ अटक

एक १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी १५ जुलै रोजी सायंकाळी शाळा सुटल्या नंतर सायकलवर तिच्या घराकडे जात होती. तेव्हा आरोपी तरुणाने दुचाकीवर तिचा पाठलाग करुन तिला रस्त्यात अडवले आणि तीचा हात धरुन विनयभंग केला. पीडित मुलीने ही घटना घरच्यांना सांगितली. मुलीच्या आईच्या फिर्यादीवरून आरोपी आरमान जब्बार शेख, (रा. तुळापुर, ता. राहुरी) याच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करून पोलीस पथकाने आरोपीला तत्काळ अटक करुन गजाआड केले. या घटनेच्या निषेधार्थ गुरुवारी (ता. १६) तुळापूर व निंभेरे गावातील ग्रामस्थांनी गाव बंद ठेऊन  घटनेचा निषेध नोंदवला. 

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर (Crime News)

यावेळी आयोजित निषेध सभेत अनेक जणांनी महिला व विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याची भावना व्यक्त केली. या प्रसंगी मनोहर महाराज सिनारे, माजी सभापती भीमराज हारदे, तुळापूरचे सरपंच दादासाहेब हारदे, अमोल हारदे, निंभेरीचे सरपंच शांताराम सिनारे, आकाश महाराज हारदे, शरद विधाते, कामगार पोलीस पाटील बाळकृष्ण हारदे, सेक्रेटरी माधव हारदे यांनी आपल्या भावना व्यक्त करत आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने कडक पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे.