NEET Exam : ZP च्या शाळेत शिकलेली श्रावणी कुदळे NEET परीक्षेत मुलींमध्ये देशात पहिली, जाणून घ्या तिच्या यशाचे गुपित!

NEET Exam : ZP च्या शाळेत शिकलेली श्रावणी कुदळे NEET परीक्षेत मुलींमध्ये देशात पहिली, जाणून घ्या तिच्या यशाचे गुपित!

0
NEET Exam : ZP च्या शाळेत शिकलेली श्रावणी कुदळे NEET परीक्षेत मुलींमध्ये देशात पहिली, जाणून घ्या तिच्या यशाचे गुपित!
NEET Exam : ZP च्या शाळेत शिकलेली श्रावणी कुदळे NEET परीक्षेत मुलींमध्ये देशात पहिली, जाणून घ्या तिच्या यशाचे गुपित!

NEET Exam : दौंड : नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA) तर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या नीट (NEET) परीक्षेत (NEET Exam) पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यातील मुलीने घवघवीत यश संपादन केले आहे. खडकी येथील श्रावणी कृष्णा कुदळे हिने या परीक्षेत ७२० पैकी ७१० गुण मिळवून चमकदार कामगिरी केली आहे. या गुणांसह श्रावणीने ‘नीट’ परीक्षेत देशात पाचवा क्रमांक, तर मुलींमध्ये देशात प्रथम (AIR 1) येण्याचा बहुमान मिळवला आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत (Zilla Parishad School) प्राथमिक शिक्षण घेऊनही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर एवढे मोठे यश मिळवता येते, हेच श्रावणीने आपल्या कामगिरीतून सिद्ध करून दाखवले आहे.

​जिल्हा परिषदेच्या शाळेतून यशाची सुरुवात

​श्रावणीचे इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतचे प्राथमिक शिक्षण दौंड तालुक्यातील गोपाळवाडी चोरमले वस्ती येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत झाले. प्राथमिक शिक्षणानंतर तिने आपले माध्यमिक शिक्षण माळेगाव येथील शारदाबाई पवार विद्यानिकेतन कॉलेजमध्ये पूर्ण केले. ग्रामीण भागातील शासकीय शाळेत सुरुवातीचे शिक्षण होऊनही तिने घेतलेली ही झेप अत्यंत कौतुकास्पद आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

​यशामागे शिक्षक पालकांचे मार्गदर्शन (NEET Exam)

​श्रावणीचे आई-वडील दोघेही शिक्षक आहेत. आपल्या मुलीने मिळवलेल्या या ऐतिहासिक यशामुळे कुदळे कुटुंबासह संपूर्ण दौंड तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. सध्या दौंड तालुक्यातील खडकी येथील तिच्या निवासस्थानी अनेक मान्यवर प्रत्यक्ष भेट देऊन तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

​काय आहे श्रावणीच्या यशाचे गुपित?

​श्रावणीने तिच्या या प्रवासाबाबत आणि अभ्यासाच्या पद्धतीबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
​सोशल मीडिया आणि मोबाईलपासून दूर: श्रावणीने वर्षभर मोबाईलचा वापर पूर्णपणे टाळला. सोशल मीडिया आणि मोबाईल स्क्रीनपासून दूर राहिल्यामुळे तिला अभ्यासावर पूर्ण लक्ष केंद्रित करता आले.
​बारामतीत घेतली परीक्षेची तयारी: तिने बारामती परिसरातील एका खाजगी क्लासमधून नीट परीक्षेची पद्धतशीर तयारी केली होती.
​सातत्य आणि निश्चित ध्येय: “जर मनात निश्चित ध्येय असेल आणि कठोर परिश्रमात सातत्य ठेवले, तर ग्रामीण भागात राहूनही Neet सारख्या परीक्षेत सर्वोत्तम यश मिळवता येते,” असा विश्वास श्रावणीने यावेळी व्यक्त केला.