Mobile Phone Theft : नगर : अहिल्यानगर शहरातील तोफखाना, कोतवाली, व भिंगार कॅम्प पोलीस ठाणे (Bhingar Camp Police Station) हद्दीत चोरी झालेली (Mobile Phone Theft) तसेच हरवलेले मोबाईलचा शोध घेऊन मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले. ७० मोबाईल सुमारे १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे (Dr. Dilip Tiparse) यांनी दिली.
मोहीम राबवत हस्तगत केले मोबाईल
पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली हरविलेले मोबाईल व चोरी गेलेल्या मोबाईल संदर्भात मोहीम राबवण्यात आले. त्यानुसार अहिल्यानगर शहरात शहर उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली, तोफखाना व भिंगार कॅम्प पोलिसांनी मोहीम राबवत मोबाईल हस्तगत केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
सुमारे १३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत (Mobile Phone Theft)
यामध्ये तोफखाना पोलीस ठाणे हद्दीत हरवलेले व चोरी झालेल्या मोबाईलचा शोध घेऊन ३० मोबाईल सुमारे सात लाखांचा मुद्द्यमाल मूळ मालकांकडे सुपूर्द करण्यात आले. कोतवाली पोलिसांनी २५ मोबाईल सुमारे तीन ते साडेतीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला. भिंगार कॅम्प पोलीस ठाणे हद्दीतुन चोरी झालेली व गहाळ झालेले असे सोळा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केली आहे. तुम्हारे पावणेदोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
यावेळी शहर उपविभागीय अधिकारी डॉ. दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली मोबाईल मालकांकडे सुपूर्त करण्यात आले यावेळी कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस अंमलदार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



