Narendraji Firodia Trophy : क्लासिकल बुद्धिबळ घेण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटना प्रसिद्ध : नरेंद्र फिरोदिया

तिसऱ्या नरेंद्र फिरोदिया चषक बुद्धिबळ स्पर्धेचा शुभारंभ

0
Narendraji Firodia Trophy : क्लासिकल बुद्धिबळ घेण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटना प्रसिद्ध : नरेंद्र फिरोदिया
Narendraji Firodia Trophy : क्लासिकल बुद्धिबळ घेण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटना प्रसिद्ध : नरेंद्र फिरोदिया

Narendraji Firodia Trophy : नगर : अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या (Ahilyanagar District Chess Association) वतीने आयोजित करण्यात आलेल्या तिसऱ्या नरेंद्रजी फिरोदिया चषक (Narendraji Firodia Trophy) अखिल भारतीय क्लासिक आंतरराष्ट्रीय मानांकन बुद्धिबळ स्पर्धेचा (Chess Tournament) प्रारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला. लक्ष्मीनारायण मंगल कार्यालय येथे सुरू झालेल्या या तीन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सिनेट सदस्य कृष्णा भंडलकर यांच्या हस्ते बुद्धिबळ पटावर प्रतीकात्मक चाल देऊन करण्यात आले.

Narendraji Firodia Trophy : क्लासिकल बुद्धिबळ घेण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटना प्रसिद्ध : नरेंद्र फिरोदिया
Narendraji Firodia Trophy : क्लासिकल बुद्धिबळ घेण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटना प्रसिद्ध : नरेंद्र फिरोदिया

नक्की वाचा : श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेटवर फसवणूकीचा आरोप; ७ जणांवर गुन्हा दाखल

सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेचे आयोजन

प्रास्ताविकात सचिव यशवंत बापट यांनी संघटनेच्या कार्याची माहिती देताना सांगितले की, या स्पर्धेसाठी आंध्र प्रदेश, गोवा, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, मध्य प्रदेश, तेलंगणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, जम्मू-काश्मीर तसेच महाराष्ट्र राज्यातून ३८० हून अधिक खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून बुद्धिबळ क्षेत्रातील नरेंद्र फिरोदिया यांच्या योगदानाचा सन्मान म्हणून त्यांच्या नावाने सलग तिसऱ्यांदा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या स्पर्धेत अवघ्या पाच वर्षांच्या बालकांपासून ते ८३ वर्षांच्या ज्येष्ठ खेळाडूंपर्यंत विविध वयोगटातील बुद्धिबळपटू सहभागी झाले असून, आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर यशाची उत्तुंग भरारी घेण्यासाठी ते सज्ज झाले आहेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन (Narendraji Firodia Trophy)

अध्यक्षीय भाषणात नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले की, अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या फिडे रेटेड क्लासिक स्पर्धेला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. बुद्धिबळ हा केवळ खेळ नसून विचारशक्ती, संयम आणि नियोजन यांची कसोटी आहे. खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी आणि त्यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी उपलब्ध करून देण्यासाठी संघटना सातत्याने प्रयत्नशील असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच कृष्णा भंडलकर यांनी आपल्या मनोगतात अहिल्यानगर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे कौतुक करत सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पारुनाथ ढोकळे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर संघटनेचे खजिनदार सुबोध ठोंबरे यांनी आभार प्रदर्शन केले.

सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन

यावेळी संघटनेचे उपाध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, सचिव यशवंत बापट, अमोल घोलप, डॉ. अमोल तांबे, सुबोध ठोंबरे, पारुनाथ ढोकळे, शाम कांबळे, अनुराधा बापट, प्रकाश गुजराथी, रोहिणी आडकर, शुभदा ठोंबरे, संजय खडके, स्वप्निल भगूरकर, नवनीत कोठारी, मनीष जसवानी, सनी गुगळे, चेतन कड, अतुल कोठारी, पंच प्रवीण ठाकरे, पवन राठी, दीपक चव्हाण, विजय ढाले, डी. बी. चौरे, शार्दुल टापसे, देवेंद्र ढोकळे, शिरीष इंदलकर, प्रशांत धंगेकर यांच्यासह सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन होते.