Fraud : नगर : श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या (Bhagwanbaba Multistate Co-operative Credit Society) शाखेत ठेवदारांनी ठेवलेली मुदत ठेव व्याजासह परत न करता तब्बल २ कोटी ४४ लाख ४२ हजार ३७७ रुपयांची फसवणूक (Fraud) व अपहार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी मल्टिस्टेटचे चेअरमन, संचालक अशा ७ जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल (Case Registered) करण्यात आला आहे.
मल्टिस्टेटकडे आपल्या रक्कमेची मागणी
याबाबत सतीश रामचंद्र पटारे (वय ५४, रा. गुगळे कॉलनी, बुऱ्हाणनगर, ता. नगर) यांनी १६ जुलै रोजी फिर्याद दिली आहे. ३ एप्रिल २०२३ ते २३ जानेवारी २०२५ या कालावधीत फिर्यादी तसेच इतर ठेवीदारांनी श्री संत भगवानबाबा मल्टिस्टेटच्या (मुख्य कार्यालय गुलाबनगर, बालमटाकळी, ता. शेवगाव) चाणक्य चौक (बुरुडगाव रोड) शाखेत लाखो रुपयांच्या ठेवी ठेवल्या होत्या. ठेवीची मुदत पूर्ण झाल्यानंतर ठेवीदारांनी मल्टिस्टेटकडे आपल्या रक्कमेची मागणी केली. मात्र, मल्टिस्टेटच्या व्यवस्थापनाने ही रक्कम व्याजासह परत न करता, ती स्वतःच्या फायद्यासाठी वापरून संस्थेची व ठेवीदारांची मोठी फसवणूक केली.
नक्की वाचा : जिल्हा न्यायालय परिसरात नव्या पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्टर जनरल यांच्या हस्ते उद्घाटन
यांच्या विरोधात गुन्हा दाखल (Fraud)
फिर्यादी व इतर ठेवीदार यांची फसवणूक झालेली रक्कम तब्बल २ कोटी ४४ लाख ४२ हजार ३७७ रुपये एवढी आहे. या फसवणूक प्रकरणी मल्टिस्टेटच्या चेअरमन मंदाकिनी रंगनाथ वैद्य, व्हा. चेअरमन मयुर रंगनाथ वैद्य (रा. बालमटाकळी, ता. शेवगाव), संचालक नितीन सोपानराव तुपे (रा. आगरकर मळा, अहिल्यानगर), संचालक शांतीनाथ नागनाथ साखरे, संचालक राम लक्ष्मण पोपळघट, संचालक किशोर अनिल सुरवसे, आणि संचालक/सीईओ जयशाली मयुर वैद्य (सर्व रा. बाळमटाकळी, ता. शेवगाव) यांच्या विरोधात कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दीपक मेढे या आर्थिक गैरव्यवहाराचा पुढील तपास करत आहेत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a



