Action against criminal gangs : दोन कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई

Action against criminal gangs : दोन कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई

0
Action against criminal gangs : दोन कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई
Action against criminal gangs : दोन कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत कारवाई

Action against criminal gangs : नगर : तोफखाना पोलीस ठाण्याच्या (Tofkhana Police Station) हद्दीतील दोन कुख्यात गुन्हेगारी टोळ्यांवर (Action against criminal gangs) बीएनएस अंतर्गत संघटित गुन्हेगारीचे वाढीव कलम लावण्याची कारवाई करण्यात आली आहे. या टोळ्यांतील आरोपींवर खुनाचा प्रयत्न (Attempted Murder), दरोडा, बलात्कार, पोक्सो, जबरी चोरी, अपहरण, घरफोडी यांसारख्या गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असून, त्यांच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी ही कारवाई करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल

२४ जून २०२६ रोजी तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला तीन ते चार जणांनी लाकडी दांडके, कमरेचा बेल्ट तसेच लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या प्रकरणी यश रावसाहेब शिरसाठ, चेतन संतोष सरोदे, विशाल बाळासाहेब पाटोळे (सर्व रा. बोल्हेगाव, अहिल्यानगर) व त्यांच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपींविरुद्ध तोफखाना, कोतवाली, एमआयडीसी आणि सुपा पोलीस ठाण्यांत खुनाचा प्रयत्न, दरोडा, गंभीर दुखापत, बलात्कार व पोक्सो, मोटारसायकल चोरी, अपहरण, दमदाटी आदी स्वरूपाचे एकूण नऊ गुन्हे नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल (Action against criminal gangs)

याशिवाय, २९ मे २०२६ रोजी नीलक्रांती चौक परिसरात एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी रोहित राजू अल्हाट आणि तिच्या पतीला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याप्रकरणी गौरव राजू अल्हाट (दोघेही रा. नीलक्रांती चौक, अहिल्यानगर) यांच्याविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोघांविरुद्ध तोफखाना, नगर तालुका आणि भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यांत खुनाचा प्रयत्न, बलात्कार व पोक्सो, विनयभंग, जबरी चोरी, घरफोडी तसेच मावा तयार करून विक्री केल्यासह गंभीर स्वरूपाचे सात गुन्हे दाखल आहेत.


पोलिसांनी यापूर्वी संबंधित आरोपींवर प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. मात्र, त्यांच्या वर्तनात सुधारणा न झाल्याने आणि ते सातत्याने गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असल्याचे निदर्शनास आल्याने प्रस्ताव अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्याकडे पाठविण्यात आला होता. प्रस्तावास मंजुरी मिळाल्यानंतर दोन्ही टोळ्यांविरुद्ध संघटित गुन्हेगारीचे वाढीव कलम लागू करण्यात आले.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी वैद्य, पोलीस कॉन्स्टेबल हेमंत झिने आणि त्यांच्या पथकाने केली.

दरम्यान, कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या तसेच सराईत गुन्हेगारांविरुद्ध यापुढेही कठोर आणि परिणामकारक कारवाई सुरू राहील. नागरिकांनी अशा गुन्हेगारांना घाबरून न जाता पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन तोफखाना पोलिसांनी केले आहे.