Sonam Wangchuk : सोनम वांगचूक यांच्या आंदोलनस्थळी राडा! पोलिसांनी सोनम यांना जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये का नेलं? 

0
Sonam Wangchuk : सोनम वांगचूक यांच्या आंदोलनस्थळी राडा! पोलिसांनी सोनम यांना जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये का नेलं? 
Sonam Wangchuk : सोनम वांगचूक यांच्या आंदोलनस्थळी राडा! पोलिसांनी सोनम यांना जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये का नेलं? 

नगर : सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) हे दिल्लीत मागील २० दिवसांपासून बेमुदत उपोषणाला (Indefinite hunger strike) बसले होते. त्यांना पोलिसांनी जबरदस्तीने आंदोलन स्थळावरून उचलून घेऊन गेल्याची माहिती समोर आली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई केल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. कॉकरोच जनता पार्टीचे (Cockroach Janata Party) संस्थापक अभिजीत दीपके (Abhijit Deepke) यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाबद्दल मोठी माहिती दिली आहे.

नक्की वाचा : सोनम वांगचुक यांचं उपोषण नेमकं कशासाठी? मागण्या काय?

सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात (Sonam Wangchuk)

बेमुदत उपोषणावर असलेले कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आलं आहे. दिल्ली पोलीस जंतर-मंतर येथील कार्यकर्त्यांवर कठोर कारवाई करत आहेत. ते लोकांना मारहाण करत असून सोनम सर यांना बळजबरीने घेऊन जात आहेत, असं अभिजीत दीपके सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटलं आहे. त्यावेळी त्यांनी सरकारच्या कारवाईवर संताप देखील व्यक्त केला. दिल्ली पोलिसांनी मला मारहाण केली आहे आणि ताब्यात घेतले आहे, असंही अभिजीत दीपके यांनी म्हटलं आहे.

अवश्य वाचा : महागाईचा मोठा परिणाम! गणेशमूर्तींचे दर २० टक्क्यांनी वाढले

‘आंदोलकांशी संवाद साधण्यास नकार देणारे हे सरकार अत्यंत क्रूर’ (Sonam Wangchuk)

डॉक्टरांनी दिलेल्या मेडिकल रिपोर्टनुसार, सोनम वांगचूक यांची तब्येत दिवसेंदिवस बिघडत चालली असून त्याचे वजन नऊ किलोंनी घटलेलं आहे. वांगचुक यांची प्रकृती खालावल्यानंतर शनिवारी जंतर मंतर आणि त्याभोवती आणि नवी दिल्ली जिल्ह्यातील काही भागांमध्ये सुरक्षा वाढवण्यात आली, असे पोलिसांनी सांगितलं आहे. ‘आंदोलकांशी संवाद साधण्यास नकार देणारे हे सरकार केवळ बेजबाबदारच नाही, तर अत्यंत क्रूर आहे,’ अशा शब्दांत ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी केंद्र सरकारवर अत्यंत गंभीर आरोप करत संताप व्यक्त केला होता.

“उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आणि त्यांची प्रकृती व वैद्यकीय स्थिती लक्षात घेऊन, सोनम वांगचुक यांना योग्य अशा सरकारी रुग्णालयात नेण्यात आले आहे. ते सध्या वैद्यकीय देखरेखीखाली आहेत, असं नवी दिल्लीचे डीसीपी सचिन शर्मा यांनी म्हटलं आहे.