Ram Shinde : राम शिंदे यांची ‘तिरकी चाल’, जिल्हा बँकेत विखेंना शह देण्याची व्यूहरचना? स्थानिक की वरिष्ठ पातळीवरून?

Ram Shinde : राम शिंदे यांची ‘तिरकी चाल’, जिल्हा बँकेत विखेंना शह देण्याची व्यूहरचना? स्थानिक की वरिष्ठ पातळीवरून?

0
Ram Shinde : राम शिंदे यांची ‘तिरकी चाल’, जिल्हा बँकेत विखेंना शह देण्याची व्यूहरचना? स्थानिक की वरिष्ठ पातळीवरून?
Ram Shinde : राम शिंदे यांची ‘तिरकी चाल’, जिल्हा बँकेत विखेंना शह देण्याची व्यूहरचना? स्थानिक की वरिष्ठ पातळीवरून?

Ram Shinde : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीची (Ahilyanagar District Cooperative Bank Election) प्रक्रिया सुरू आहे. त्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. इतर निवडणुकांप्रमाणे ही निवडणूकही सत्ताधाऱ्यांच्या सोयीचीच असल्याचे मानले जात आहे. मात्र, यामध्ये सत्ताधाऱ्यांच्या आपसांत राजकीय खेळ्या सुरू झाल्याचे दिसून येत आहे. विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे (Prof. Ram Shinde) प्रथमच या निवडणुकीत सक्रीय झाले आहेत. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांना डावलून शिंदे भाजपमधील आणि विरोधातील नेत्यांच्याही भेटीगाठी घेत आहेत. त्यामुळे विखेंविरूद्धचीही व्यूहरचना तर नाही ना? अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

राम शिंदे सक्रीयपणे बँकेच्या राजकारणात

बँकेच्या निवडणुकीत सोसायट्यांच्या ठरावांची प्रक्रिया आता पूर्ण झाली आहे. सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी नेत्यांनी आपल्या सोयीचे ठराव करून घेतले आहेत. मुख्य म्हणजे आतापर्यंत या प्रक्रियेत कधीही भाग न घेणारे राम शिंदे यांचेही दोन ठिकाणांहून ठराव झाले आहेत. त्यामुळे ते आता सक्रीयपणे बँकेच्या राजकारणात उतरले आहेत.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

शिंदे यांच्याकडून नेत्यांच्या गाठीभेटी (Ram Shinde)

एवढ्यावरच न थांबता त्यांनी स्वंतत्र पॅनल तयार करण्याची चाचपणी सुरू केल्याचे सांगण्यात येते. त्यासाठी शिंदे सध्या जिल्ह्यातील नेत्यांच्या भेटी गाठी घेत आहेत. यात केवळ सत्ताधारीच नव्हे तर विरोधी पक्षातील नेत्यांच्याही ते भेटी घेत आहेत. अलीकडेच शिंदे यांनी पाथर्डी तालुक्यातील ज्येष्ठ नेते अप्पासाहेब राजळे तसेच भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांची भेट घेतली. आज ते संगमनेर तालुक्यातील बाजीराव खेमनर यांची भेट घेण्यासाठी जात आहेत. खेमनर हे बँकेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे समर्थक आहेत. त्यानंतर शिंदे उद्या राहुरीत आमदार प्राजक्त तनपुरे यांही भेट घेणार आहेत.


यासोबतच शिंदे यांचे आमदार विवेक कोल्हे एवढेच नव्हे तर खासदार नीलेश लंके यांच्याशीही चांगले संबंध असल्याचे यापूर्वीही आढळून आलेले आहे. शिंदे नगरचे पालकमंत्री असतानाही बँकेच्या नगर इतर स्थानिक राजकारणात एवढे सक्रीय झालेले दिसून आले नाहीत. गेल्यावर्षीपासून त्यांनी बँकेच्या राजकारणात लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे. या बँकेत राजकीय पक्षांचा फारसा संबंध न आणण्याची परंपरा आहे. मात्र, जिल्ह्यातील दिग्गज नेते बँक आपल्याच ताब्यात ठेवण्यास, आलटून पालटून बँकेची सत्ता मिळविण्यात यश मिळवितात. अशा परिस्थित आता राम शिंदे यांनी वेगळ्या हालचाली सुरू केल्या आहेत. शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नीकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांची ही खेळी स्थानिक पातळीवरील आहे की त्यांना वरिष्ठ पातळीवरून यासाठी ग्रीन सिग्नल मिळाला आहे, याची चर्चा आता सुरू झाली आहे.