नगर : ऐन सणासुदीच्या तोंडावर महाराष्ट्रातील लालपरीने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला मोठी कात्री (ST Bus Fare) लागली आहे. डिझेलचे वाढते दर आणि वाढत्या खर्चाचा ताळमेळ घालण्यासाठी अखेर राज्य परिवहन महामंडळाने तिकीट दरात सरासरी १३.५६ टक्के भाडेवाढ (Fare hike) करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाने (STA) या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, हे नवे दर लागू झाले आहेत. मात्र, या दरवाढीतून मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या प्रीमियम एसी शिवनेरी, शिवशाही बस प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला असून, त्यांचे भाडे जैसे थे ठेवण्यात आले आहे. आजपासून तिकीट दर ५ ₹ च्या पटीत होणार आहे.
नक्की वाचा : सोनम वांगचूक यांच्या आंदोलनस्थळी राडा! पोलिसांनी सोनम यांना जबरदस्तीने हॉस्पिटलमध्ये का नेलं?
महामंडळाने यापूर्वी जानेवारी २०२५ मध्ये भाडेवाढ केली होती. महामंडळाच्या विविध सेवांसाठीचे प्रौढ आणि लहान मुलांचे तिकीट दर ठरवण्यात आले आहेत. महामंडळाच्या नियमांनुसार ५.५% प्रवासी कर वगळून येणाऱ्या रकमेवर ५% जीएसटी जोडण्यात आलाय. त्यामुळे अंतिम तिकीट दर हे ५ रुपयांच्या पटीत निश्चित करण्यात आले. सुट्या पैशांवरून वाहक व प्रवाशांमध्ये वाद होणार नाहीत. त्याशिवाय अमृत जेष्ठ नागरिकांकडून सुद्धा ५ रुपये वसूल करण्यात येणार आहेत, असं देखील आता ठरवण्यात आलं आहे.
अवश्य वाचा : महागाईचा मोठा परिणाम! गणेशमूर्तींचे दर २० टक्क्यांनी वाढले
कोणत्या बस सेवांच्या भाड्यात वाढ झाली आहे? (ST Bus Fare)
साधी बस सेवा (साधी, राजमाता जिजाऊ, मिडी)
विनावातानुकूलित शयन-आसनी (Non-AC Sleeper-cum-Seater)
विनावातानुकूलित शयनयान (Non-AC Sleeper)
कोणत्या बस सेवांच्या भाड्यात वाढ झालेली नाही? (ST Bus Fare)
शिवनेरी (आसनी व शयनयान)
शिवशाही (आसनी व शयनयान)
जनशिवनेरी ९ मीटर व १२ मीटर ई-बस
ई-शिवाई
निमआराम (Asiad) बस सेवा
या बसच्या तिकीट दरांमध्ये कोणताही बदल झालेला नाही.
किती भाडेवाढ झाली? (ST Bus Fare)
साधी बस (Ordinary): भाडे दर रु. ११.४० प्रति टप्पा
सेमी-लक्झरी (Semi-Luxury): भाडे दर रु. १३.६५ प्रति टप्पा.
ऑर्डिनरी स्लीपर-सीटर (Ord Sleeper-Seater):
भाडे दर रु. १५.५० प्रति टप्पा.
ऑर्डिनरी स्लीपर (Ord Sleeper): भाडे दर रु. १६.७५ प्रति टप्पा
आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ, तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला असल्याचा दावा महामंडळाने केला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी ही दरवाढ अपरिहार्य असल्याचे स्पष्ट केले. ही दरवाढ करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल याची काळजी घेतल्याचा दावा केला आहे. या नव्या निर्णयामुळे सर्वसामान्य प्रवाशांना आता जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत.



