National Film Awards : अहिल्यानगरच्या मातीत बनलेल्या ‘हमसफर’ लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर; सर्वोत्कृष्ट लघुपटाने गौरव

अहिल्यानगरच्या मातीत बनलेल्या ‘हमसफर’ लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर; सर्वोत्कृष्ट लघुपटाने गौरव

0
National Film Awards : अहिल्यानगरच्या मातीत बनलेल्या ‘हमसफर’ लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर; सर्वोत्कृष्ट लघुपटाने गौरव
National Film Awards : अहिल्यानगरच्या मातीत बनलेल्या ‘हमसफर’ लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार जाहीर; सर्वोत्कृष्ट लघुपटाने गौरव

National Film Awards : नगर : 72 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. यामध्ये अहिल्यानगरच्या मातीत निर्मित ‘हमसफर’ (Humsafar) या लघुपटाने राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट लघुपटाचा (Best Non-Feature/Short Film) मान पटकावून एक नवा इतिहास रचला आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा दिग्दर्शक अभिजित दळवी यांनी सांभाळली असून, निर्मिती नरेंद्र फिरोदिया (Narendra Firodia) (अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेनमेंट्स) यांनी केली आहे.

नक्की वाचा : महाराष्ट्रात आढळले कोरोनाचे रुग्ण, आंध्रात चौघांचा मृत्यू; कुठे किती रुग्ण?

‘हा’ ठरला सर्वोत्कृष्ट चित्रपट

फीचर फिल्म श्रेणीमध्ये, ‘सर्वोत्कृष्ट चित्रपट’चा पुरस्कार श्रीकांत (Srikanth) या चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाचे दिग्दर्शन तुषार हिरानंदानी यांनी केले असून यात राजकुमार राव मुख्य भूमिकेत आहे. तर नॉन-फीचर फिल्म श्रेणीमध्ये, ‘सर्वोत्कृष्ट माहितीपट’चा पुरस्कार राम-नामी (Ram-Nami) (हिंदी) या चित्रपटाला मिळाला.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म (National Film Awards)

सामाजिक आणि पर्यावरणीय मूल्यांना प्रोत्साहन देणाऱ्या ‘सर्वोत्कृष्ट नॉन-फीचर फिल्म’चा पुरस्कार पिप्लांत्री: अ टेल ऑफ इको-फेमिनिझम (Piplantri: A Tale of Eco-Feminism) (हिंदी, राजस्थानी आणि इंग्रजी) या चित्रपटाला मिळाला. तर नॉन-फीचर श्रेणीतील ‘सर्वोत्कृष्ट लघुपट’ चा पुरस्कार ‘हमसफर’ (Humsafar) या मराठी चित्रपटाला मिळाला आहे.

स्थानिक कलाकारांच्या योगदानातून साकारला लघुपट

सर्वोत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार विजेत्या ‘हमसफर’ची निर्मिती उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या ‘अनुष्का मोशन पिक्चर्स अँड एंटरटेन्मेंट’ या बॅनरखाली झाली आहे. हा लघुपट प्रामुख्याने अहिल्यानगर येथील स्थानिक कलाकारांच्या योगदानातून साकारला आहे. दिग्दर्शन आणि लेखन राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक अभिजित अरविंद दळवी यांचे आहे. तर मुख्य भूमिका प्रसिद्ध मराठी अभिनेते विजय पाटकर यांनी साकारली आहे. कार्यकारी निर्माते म्हणून प्रणित मेढे आणि पुष्कर तांबोळी यांनी काम पाहिले.

या लघुपटात एकही संवाद नाही

या लघुपटाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यात एकही संवाद नाही. संपूर्ण कथा पात्रांच्या चेहऱ्यावरील भाव आणि पार्श्वसंगीताच्या माध्यमातून पुढे सरकते. ही कथा एका आजोबांची (विजय पाटकर) आणि त्यांच्या जुन्या रेडिओची आहे. हा रेडिओ केवळ एक वस्तू नसून, त्यांच्यासाठी एक हक्काचा ‘हमसफर’ (सोबती) बनला आहे. वस्तूंच्या माध्यमातून जुन्या आठवणी कशा जिवंत राहतात आणि माणसाचे वस्तूंशी किती घट्ट भावनिक नाते जडू शकते, याचे उत्कृष्ट चित्रण यात केले आहे.

‘इंडियन पॅनोरमा’ अंतर्गत या फिल्मचे विशेष स्क्रीनिंग

यापूर्वीही या लघुपटाला विविध पुरस्कार आणि सन्मान मिळाले आहेत. या लघुपटाला ‘दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल २०२५’ मध्ये ‘सर्वोत्कृष्ट लघुपट’ (Best Short Film) या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
गोव्यात पार पडलेल्या ५६ व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI 2025) ‘इंडियन पॅनोरमा’ अंतर्गत या फिल्मचे विशेष स्क्रीनिंग करण्यात आले आणि तिथे समीक्षकांनी याचे भरभरून कौतुक केले. आणि आता राष्ट्रीय पुरस्काराने आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.