Accident : राहुरी : तालुक्यातील डिग्रस फाटा येथे नगर-मनमाड राज्य महामार्गावर (Nagar-Manmad State Highway) शुक्रवारी (ता. १७) सायंकाळी चारचाकी कार व रिक्षाचा भीषण अपघात (Accident) झाला. या घटनेत तीन जण गंभीर जखमी दोनजण किरकोळ जखमी (Injured) झाले असून एक ५५ वर्षीय महिला जागीच ठार झाली.
नक्की वाचा : धार्मिक स्थळी नोंदणी आढळल्यास कारवाई : राधाकृष्ण विखे पाटील
कारची रिक्षाला जोरदार धडक
मिळालेल्या माहितीनुसार, चांगुनाबाई पवार व त्यांचे पती (ता. १७) सायंकाळी पावणेपाच वाजे दरम्यान रिक्षामध्ये बसून राहुरीकडून डिग्रस येथे जात होते. रिक्षा नगर मनमाड महामार्गावर वरुन डिग्रस फाट्याकडे वळत असताना एक चारचाकी गाडी नगरकडून राहुरीकडे येत होती. त्यावेळी चारचाकी कारने रिक्षाला जोरदार धडक दिली. यावेळी रिक्षा दोन ते तीन पलटी घेऊन रस्त्याच्या कडेला पडली. अपघाता नंतर परिसरातील नागरिकांनी ताबडतोब घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
उपचारापूर्वीच मयत घोषित (Accident)
या भीषण अपघातात रिक्षामधील चांगुनाबाई भिमा पवार, वय ५५ वर्षे, रा. डिग्रस, ता. राहुरी, ह्या जागीच ठार झाल्या तर रिक्षा चालक सिताराम शिंदे, (रा. गोटूंबे आखाडा), भिमा बाबूराव पवार, (रा. डिग्रस) तसेच चारचाकी कारमध्ये असलेले दिपक संभाजी हारे, रोहिणी दिपक हारे या पती-पत्नीसह त्यांचा मुलगा दक्ष दिपक हारे, (वय १० वर्षे, तिघे रा. लोणी) हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर राहुरी येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर चांगुनाबाई पवार यांना राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. वैद्यकीय अधिकारी सुधीर क्षिरसागर यांनी त्यांना तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केले. घटनेची माहिती कळताच डिग्रस परिसरातील नागरिकांनी रुग्णालयासमोर प्रचंड गर्दी केली होती. चांगुनाबाई पवार यांच्या अपघाती निधनाने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.



