MD Drugs : अहिल्यानगरात ३० लाख रूपयांचे एमडी ड्रग्स जप्त; तोफखाना पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात

MD Drugs : अहिल्यानगरात ३० लाख रूपयांचे एमडी ड्रग्स जप्त; तोफखाना पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात

0
MD Drugs : अहिल्यानगरात ३० लाख रूपयांचे एमडी ड्रग्स जप्त; तोफखाना पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात
MD Drugs : अहिल्यानगरात ३० लाख रूपयांचे एमडी ड्रग्स जप्त; तोफखाना पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात

MD Drugs : नगर : अहिल्यानगर शहरातील सावेडी उपनगरातील मिस्किनमळा परिसरात तोफखाना पोलिसांच्या (Tofkhana Police Station) गुन्हे शोध पथकाने रविवारी (ता.१९) धडक कारवाई करत सुमारे ३० ते ३२ लाख रुपये किमतीचे १५० ते १६० ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) (MD Drugs) जप्त केले. या कारवाईत संशयास्पद विनाक्रमांकाच्या कारसह तिघांना ताब्यात घेण्यात आले असून, वाहनातील अन्य दोघे संशयित पसार झाले आहेत. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे.

नक्की वाचा : पत्नीच्या खूनप्रकरणी पतीला अटक; तालुका पोलिसांची कामगिरी

यांना घेण्यात आले ताब्यात

या प्रकरणात वसीम खलील बागवान (वय ३८, रा. पिंजर गल्ली, चाचा मेससमोर), झिशान शौकत सय्यद (वय २७, रा. सहारा कॉलनी, मुकुंदनगर) आणि रेहान जावेद शेख (वय २४, रा. छोटी मशीद, मुकुंदनगर) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. तर जमीर भाई आणि एक अनोळखी इसम पसार असून, त्यांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.

🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a

पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडविले (MD Drugs)

तोफखाना पोलिसांचे गुन्हे शोध पथक मिस्किनमळा परिसरात गस्त घालत असताना विनाक्रमांकाची स्विफ्ट कार संशयास्पदरीत्या फिरताना आढळली. पोलिसांनी वाहन थांबविण्याचा इशारा केला असता चालकाने वेग वाढवून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडविले. कारवाईची चाहूल लागताच वाहनातील दोघे जण पसार झाले. तर झिशान शौकत सय्यद, रेहान जावेद शेख आणि वसीम खलील बागवान या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यानंतर वाहनाची कसून झडती घेतली असता १५० ते १६० ग्रॅम वजनाचे मेफेड्रोन (एमडी) हा अमली पदार्थ आढळून आला. तसेच पिस्तुलासारखे दिसणारे एक लायटर, एक एअर गन, मास्क, कटावणी आणि दरोडा टाकण्यासाठी वापरले जाणारे अन्य साहित्यही पोलिसांनी जप्त केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तोफखाना पोलिसांनी तातडीने फॉरेन्सिक पथकाला पाचारण केले. प्राथमिक तपासणीत जप्त केलेला पदार्थ मेफेड्रोन असल्याचे स्पष्ट झाले असून, त्याची काळ्या बाजारातील किंमत सुमारे ३० ते ३२ लाख रुपये असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तोफखाना पोलीस ठाण्यात रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल कारण्यात आला आहे.