Sonam Wangchuk : मोठी बातमी! अखेर २३ व्या दिवशी सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे

0
Sonam Wangchuk : मोठी बातमी! अखेर २३ व्या दिवशी सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे
Sonam Wangchuk : मोठी बातमी! अखेर २३ व्या दिवशी सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे

नगर :  केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आणि ‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) शिष्टमंडळासोबत केलेल्या चर्चेनंतर समाजसेवक सोनम वांगचुक (Sonam Wangchuk) यांनी उपोषण मागे घेतले. सरकारने चर्चेसाठी पुढाकार घेतल्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचे CJP च्या नेत्यांनी सांगितलं आहे.

वांगचुक हे २८ जूनपासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे आमरण उपोषणाला बसले होते. त्यांच्या सोबत इतर आंदोलकांसह AISA या विद्यार्थी संघटनेचे तीन सदस्यही उपोषणात सहभागी होते. सरकारकडून चर्चेची प्रक्रिया सुरू करण्यात आल्यानंतर आता उपोषण मागे घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

नक्की वाचा : शिर्डीत रक्तरंजित थरार! काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच चाकूने वार

मंत्र्यांनी दिला फक्त १० मिनिटांचा वेळ (Sonam Wangchuk)

सोमवारी केंद्र सरकारने CJP सोबत चर्चा सुरू केली. पक्षाचे प्रवक्ते सौराव दास आणि नेते आशुतोष रांका यांनी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांची भेट घेतली. आपल्या मागण्या स्पष्ट आहेत, शिक्षण व्यवस्था सुधारण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलली पाहिजेत, अशी ‘सीजेपी’ची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले. सीजेपीचे शिष्टमंडळ तसेच जे.पी.नड्डा यांच्यात दहा मिनिटे चर्चा झाली.

या बैठकीनंतर सौरभ दास यांनी आपल्या सोशल मीडियावर बैठकीत काय झालं, याविषयी माहिती दिली. दोन महिने वाट पाहून जे. पी. नड्डा यांच्याशी फक्त दहा मिनिटेच भेट होऊ शकली, अशी नाराजीही त्यांनी व्यक्त केली. आम्ही आमच्या मागण्यांचे पत्र त्यांना दिलंय. आम्ही अंतर्गत या मागण्यांवर चर्चा करू,असे आश्वासन नड्डा यांना दिल्याचेही त्यांनी सांगितलं आहे.

अवश्य वाचा : हरिश्चंद्र गडावर मोठी दुर्घटना, दरड कोसळून चार पर्यटक गंभीर जखमी

नेमक्या मागण्या काय? (Sonam Wangchuk)

सोनम वांगचूक यांची लवकरात लवकर सुटका करावी, शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावा, नीट परीक्षेमुळे आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना एक कोटींची आर्थिक मदत द्यावी, अशा मागण्याही सीजेपीने केल्या आहेत. आता सरकार यावर काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.