Health Camp : नगर : अहिल्यानगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील श्रीगोंदा व पाथर्डी तालुक्यातील दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांसाठी मोफत साहाय्य साधन व उपकरण वितरणासाठी मूल्यमापन शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम यांच्यामार्फत लोकसभा सदस्य निलेश ज्ञानदेव लंके यांच्या निर्देशानुसार ही शिबिरे घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे दिव्यांग सक्षमीकरण सहाय्यक आयुक्त देविदास कोकाटे यांनी दिली.
अवश्य वाचा : हरिश्चंद्र गडावर मोठी दुर्घटना, दरड कोसळून चार पर्यटक गंभीर जखमी
येथे शिबिराचे आयोजन
श्रीगोंदा तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी १ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत कम्युनिटी हॉल, पंतनगर, श्रीगोंदा नगरपालिका येथे शिबिर होणार आहे. तसेच पाथर्डी तालुक्यातील लाभार्थ्यांसाठी ८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत ग्रामीण रुग्णालय, पाथर्डी येथे शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
कागदपत्रे (Health Camp)
राष्ट्रीय वयोश्री योजनेअंतर्गत ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्यात येईल. यासाठी आधार कार्ड व मासिक १५ हजार रुपये किंवा वार्षिक १ लाख ८० हजार रुपयांपर्यंतचे उत्पन्न दर्शविणारा उत्पन्नाचा दाखला अथवा रेशन कार्ड आवश्यक आहे. वरील दोन कागदपत्रे सादर केल्यानंतरच तपासणी केली जाईल. लाभार्थ्याने मागील तीन वर्षांत या योजनेअंतर्गत लाभ घेतलेला नसावा. या योजनेतून व्हीलचेअर, कमोडसह व्हीलचेअर, काठ्या, श्रवणयंत्र, कंबरेचे, पाठीचे व गुडघ्याचे पट्टे, बसण्याची गादी व कमोड चेअर आदी साहित्य वितरित करण्यात येणार आहे.



