Online Application : नगर : सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयाच्या दिव्यांगजन सक्षमीकरण विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या सन २०२६ च्या दिव्यांग सशक्तीकरण राष्ट्रीय पुरस्कारांसाठी ऑनलाइन अर्ज व नामांकने मागविण्यात आली असून, अर्ज करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२६ आहे. या पुरस्कारांसाठी पात्र दिव्यांग व्यक्ती, संस्था, स्वयंसेवी संस्था, नियोक्ते व कर्मचाऱ्यांनी मुदतीत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा परिषदेचे दिव्यांग सक्षमीकरण सहाय्यक आयुक्त देविदास कोकाटे यांनी केले आहे.
अवश्य वाचा : हरिश्चंद्र गडावर मोठी दुर्घटना, दरड कोसळून चार पर्यटक गंभीर जखमी
इथे करा अर्ज (Online Application)
या पुरस्कारांसाठी अर्ज स्वीकारण्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार पोर्टल १५ मे २०२६ पासून खुले करण्यात आले आहे. अर्ज व नामांकने https://awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर केवळ ऑनलाइन पद्धतीनेच सादर करावीत. प्रत्यक्ष किंवा इतर कोणत्याही माध्यमातून प्राप्त झालेले अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
ही कागदपत्रे आवश्यक (Online Application)
नामांकन करताना पोर्टलवरील विहित नमुन्यात सर्व आवश्यक तपशील भरणे बंधनकारक आहे. अर्जामध्ये संबंधित व्यक्ती अथवा संस्थेची उल्लेखनीय व प्रेरणादायी कामगिरी स्पष्टपणे नमूद करावी. तसेच त्या कामगिरीशी संबंधित आवश्यक समर्थनार्थ कागदपत्रे पोर्टलवर अपलोड करणे आवश्यक आहे.सर्वश्रेष्ठ दिव्यांगजन, श्रेष्ठ दिव्यांगजन व श्रेष्ठ सृजनशील दिव्यांग बालक किंवा बालिका या उपश्रेणींसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी युडीआयडी (UDID) कार्ड किंवा दिव्यांगत्व प्रमाणपत्र अपलोड करणे अनिवार्य आहे.



