Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन, राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या 

0
Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन, राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या 
Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन, राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या 

नगर : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीने (Cockroach Janata Party)आंदोलन पुकारलं आहे. सीजेपीनं काल (ता.२०) जंतर मंतर ते संसद भवन असा मोर्चा आयोजित केला होता. या मोर्चावर दिल्ली पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. या आंदोलनात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भेट घेतली.

आज राहुल गांधी, प्रियंका गांधी, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह काँग्रेस खासदार आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांच्या पाठिंब्यासाठी राहुल गांधी यांनी नवी दिल्लीतील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबेहर ठिय्या आंदोलन सुरु केलं आहे. दुसरीकडे शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व खासदार जंतर मंतरवर आंदोलकांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत.

नक्की वाचा : शेतकऱ्यांना दिलासा! कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार

सीजेपीच्या आंदोलनात कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार सहभागी (Rahul Gandhi)

विशेष बाब म्हणजे या सीजेपीच्या धरणे आंदोलनात कर्नाटकचे मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार देखील सहभागी झाले आहेत. यावेळी काँग्रेस खासदारांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरेग यांनी देखील घोषणाबाजी केली. मोदींची हुकुमशाही चालणार नाही, मोदी हाय हाय, अमित शाह हाय हाय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्यात.

अवश्य वाचा : शिर्डीत रक्तरंजित थरार! काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच चाकूने वार

‘जेव्हा मोदी घाबरतात त्यावेळी पोलिसांना पुढं करतात’ (Rahul Gandhi)

काँग्रेस खासदारांनी यावेळी धर्मेंद्र प्रधान, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विद्यार्थ्यांचं दमन बंद करावं, विद्यार्थ्यांना मारहाण बंद करावी, अशी घोषणा बाजी काँग्रेस खासदारांनी केली. जेव्हा जेव्हा मोदी घाबरतात त्यावेळी पोलिसांना पुढं करतात, अशा प्रकारच्या घोषणा देखील काँग्रेस नेत्यांनी दिल्या.  त्यामुळे दिल्ली पोलिसांनी काँग्रेस खासदारांना देखील ताब्यात घेतलं.

राहुल गांधी यांनी आज सकाळी संसद परिसरातून विद्यार्थी आंदोलकांवर झालेल्या लाठीमारात संदर्भात भूमिका मांडली.  विद्यार्थ्यांचा भविष्याचा मुद्दा आहे. आम्ही लोकसभा अध्यक्षांना चर्चेची मागणी केली. लोकसभा अध्यक्षांना चर्चेसाठी सरकारची परवानगी लागते म्हणजे काय ते ओळखा. मुलांना झालेली मारहाण अत्यंत निंदनीय आहे. काल जे काही घडलं त्यावर मोदींनी अद्यापही माफी मागितलेली नाही, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.