ST Bus | नगर : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी एसटी महामंडळ ( ST Bus ) सज्ज झाले असून, अहिल्यानगर विभागाच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी आज पासून (ता.२०) पासून २३० जादा बसची व्यवस्था केली आहे.
नक्की वाचा : शिर्डीत रक्तरंजित थरार! काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच चाकूने वार
बस सुटणार ( ST Bus )
तसेच पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या जादा बस पंढरपूर येथील विठ्ठल साखर कारखाना यात्रा केंद्रावरील शेड क्रमांक ३ येथे थांबणार आहेत. दर्शनानंतर परतीसाठी तेथूनच बस सुटणार आहेत. भाविकांनी मागणी केल्यास गावातूनही बसचे नियोजन केले जाणार आहे. मात्र, गावापासून भाडे आकारणी केली जाणार आहे. भाविकांनी या जादा बसद्वारेच प्रवास करावा, असे आवाहन अहिल्यानगर विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी केले आहे.
अवश्य वाचा : हरिश्चंद्र गडावर मोठी दुर्घटना, दरड कोसळून चार पर्यटक गंभीर जखमी
आषाढी यात्रेस प्रारंभ ( ST Bus )
त्यासाठी आज सकाळपासूनच तारकपूर बस स्थानकात अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सध्या देखील पंढरपूरसाठी महामंडळाच्या नियमित बस हाऊसफूल धावत आहेत. आज रोजी सप्तमी असून, या दिवशी आषाढी यात्रेस प्रारंभ झाला. या दिवसापासून अहिल्यानगर विभागाच्या वतीने ३० जुलैपर्यंत २८० जादा बस सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय धुळे विभागाच्या ७५ व जळगाव विभागाच्या ७५ बसही उपलब्ध करण्यात आले आहेत. पंढरपूर यात्रेसाठी जाणाऱ्या जादा बस पंढरपूर येथील विठठल साखर कारखाना यात्रा केंद्रावरील शेड क्रमांक ३ येथे थांबणार आहेत. दर्शनानंतर परतीसाठी तेथूनच बस सुटणार आहेत. भाविकांनी मागणी केल्यास गावातूनही बसचे नियोजन केले जाणार आहे. मात्र, गावापासून भाडे आकारणी केली जाणार आहे. भाविकांनी या जादा बसव्दारेच प्रवास करावा असे आवाहन अहिल्यानगर विभाग नियंत्रक राजेंद्र जगताप यांनी केले आहे.
आगार निहाय जादा बसची संख्या ( ST Bus )
तारकपूर ३१, शेवगाव २४, जामखेड २२, श्रीरामपूर २६, कोपरगाव ३४, पारनेर २१, संगमनेर २८, श्रीगोंदा ३३, नेवासा २१, पाथर्डी २४, अकोले १६. असणार आहे. मात्र, शेवगाव, पाथर्डी, जामखेड व श्रीगोंदा या चार आगारांच्या बस माहिजळगाव मार्गे पंढरपूरकडे जाणार आहेत.



