नगर : राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर (First list of loan waivers) करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी सांगितले आहे. येत्या ३० जुलैआधी कर्जमाफीचा निर्णय (Farmers Loan Waiver) घेतला जाईल,अशी चर्चा होती. सरकारकडून देखील कर्जमाफी संदर्भात जोरदार हालचाली सुरू आहेत. अशातच मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
नक्की वाचा : हरिश्चंद्र गडावर मोठी दुर्घटना, दरड कोसळून चार पर्यटक गंभीर जखमी
अजित पवारांच्या जयंतीचे निमित्त साधून कर्जमाफी (Farmers Loan Waiver)

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधताना राज्यासह देशातील अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या जयंतीवर बोलताना मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबाबत महत्वाची अपडेट दिली आहे. त्यांनी सांगितले की, कर्जमाफीसाठी पात्र शेतकऱ्यांची पहिली यादी उद्या जाहीर केली जाणार आहे. उद्या (ता.२२) दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचं औचित्य साधून ही यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. यासाठी बाबासाहेब पाटील तयारी करत आहेत.
अवश्य वाचा : शिर्डीत रक्तरंजित थरार! काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच चाकूने वार
‘कुठलंही आंदोलन असले की काही चुकीच्या प्रवृत्ती आंदोलनात शिरतात’ (Farmers Loan Waiver)
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्लीतील सीजेपीच्या आंदोलनावर प्रतिक्रिया देताना विरोधकांवर टीका केली. त्यांनी सांगितले की, ‘कुठलंही आंदोलन असले की काही चुकीच्या प्रवृत्ती आंदोलनात शिरत असतात. ते आपला स्वार्थ साधत असतात. दिल्लीतल्या आंदोलनात अनेक राजकीय पक्ष आणि संघटना आपापले हेतू साध्य करून अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत.’



