Illegal sand transportation | अवैध वाळू वाहतुकीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; आठ लाख तीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत

0

Illegal sand transportation | नगर : नेवासा पोलीस ठाणे हद्दीत सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतूक ( Illegal sand transportation ) करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत आठ लाख तीस हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रोहीदास गुलाब जाधव (वय ३१, रा. गंगानगर, ता.नेवासा जि. अहिल्यानगर), कैलास पवार (पूर्ण नाव माहीत नाही, रा. गंगानगर, नेवासा, ता.नेवासा जि. अहिल्यानगर), असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. 

नक्की वाचा : शिर्डीत रक्तरंजित थरार! काकडी विक्रेत्या महिलेवर महिलांकडूनच चाकूने वार

खात्रीशीर माहिती नुसार कारवाई ( Illegal sand transportation )

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना मिळालेल्या माहितीनुसार नेवासा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या भानस हिवरे परिसरात अवैध वाळू वाहतूक होत असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून एक डम्पर ताब्यात घेतला. त्यामध्ये तीन ब्रास वाळू व गुन्ह्यात वापरलेला डंपर असा एकूण आठ लाख ३० हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याबाबत पथकाने चालक रोहीदास गुलाब जाधव याला ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता डंपर मालक  कैलास पवार हा पसार झाला असून यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : हरिश्चंद्र गडावर मोठी दुर्घटना, दरड कोसळून चार पर्यटक गंभीर जखमी

कारवाईसाठीचे पथक ( Illegal sand transportation )

ही कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक संदीप दरवडे, पोलीस अंमलदार बाळासाहेब नागरगोजे, बाळासाहेब गुंजाळ योगेश कर्डिले, प्रकाश मांडगे यांच्या पथकाने केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here