नगर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच बीसीसीआयने (BCCI New Rule) देशांतर्गत क्रिकेटमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी नियमात कठोर बदल (Strict changes in cricket rules) केले आहेत. २०२६-२७ च्या देशांतर्गत क्रिकेट पर्वापूर्वी बीसीसीआयने खेळाच्या नियमात महत्त्वपूर्ण बदले केले आहेत. आता जाणीवपूर्वक नो बॉल (No Ball) टाकणाऱ्या गोलंदाजाला संपूर्ण सामन्यातून निलंबित केलं जाणार आहे.
नक्की वाचा : रक्षकच बनला भक्षक! शेवगाव घोटाळ्यात लाच मागणारा पोलीस कर्मचारी अखेर निलंबित!
जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर… (BCCI New Rule)
बीसीसीआयच्या नियमानुसार, जाणूनबुजून फ्रंट फूट नो बॉल टाकल्यास संपूर्ण सामन्यासाठी गोलंदाजावर बंदी घालण्याची तरतूद केली आहे. तसेच सुधारित खेळण्याच्या नियमात बदल करताना दिवसाच्या खेळाचे शेवटचे षटक, डाव घोषित करणे किंवा सोडून देणे, विकेटकीपिंगचे नियम आणि ड्रिंकस ब्रेक दरम्यान प्रशिक्षकाच्या भूमिका यांचाही समावेश केला आहे. देशांतर्गत हंगामाची सुरूवात पुढच्या महिन्यात दुलीप ट्रॉफीने होणार आहे. त्यामुळे या नियमांची चर्चा आहे.
अवश्य वाचा : शेतकऱ्यांना दिलासा! कर्जमाफीची पहिली यादी उद्या जाहीर होणार
नो बॉल प्रकरणात यापूर्वी गोलंदाजाला फक्त त्या डावापुरता गोलंदाजीपासून रोखलं जात होतं. पण बीसीसीआयने आता मेरीलेबोन क्रिकेट क्लबने सुचवलेल्या सुधारणांचा अवलंब करण्याचा निर्णय घेतलाय. माहितीनुसार, खेळण्याच्या अटीमध्ये नियम ४१.८ मध्ये बदल करण्यात आला आहे. यानुसार गोलंदालाजा संपूर्ण सामन्यासाठी निलंबित करण्याचा निर्णय मैदानातील पंच घेतील. जाणीवपूर्वक फ्रंट-फूट नो-बॉल टाकल्यास किंवा खेळपट्टीवर न पडणारा चेंडू टाकल्यास दोषी आढळलेल्या गोलंदाजाला उर्वरित सामन्यासाठी गोलंदाजी करण्यास मनाई केली जाईल.
मुख्य प्रशिक्षकाला ड्रिंक्स ब्रेक दरम्यान मैदानात प्रवेश (BCCI New Rule)
दुसरीकडे, बीसीसीआयने नियम १२.५.२ मध्ये देखील बदल केला आहे. आता दिवसाचे शेवटचे षटक खेळताना विकेट पडली तरी ते षटक पूर्ण करणे बंधनकारक असणार आहे. यापूर्वी नियोजित अंतिम षटकात विकेट पडली तर पंच खेळ थांबवू शकत होते. इतकंच काय तर संघांना सामन्याचा अंतिम डाव घोषित करण्यास किंवा सोडून देण्यासही बंदी घातली आहे. नियम १५.२ मध्ये बदल करण्यात आला आहे. यापूर्वी कृत्रिम निकाल मिळवण्यासाठी हा निर्णय घेतला जात होता. वनडे सामन्यात संघाच्या मुख्य प्रशिक्षकाला आता ड्रिंक्स ब्रेक दरम्यान मैदानात प्रवेश करता येणार आहे. आयसीसीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये असा नियम लागू करण्याचा आधीच प्रस्ताव दिला आहे.



